मल्हारीमार्तंड षड्रात्रीघटस्थापना विधी
(मार्गशीर्षशुक्ल 1 तेमार्गशीर्षशुक्ल 6) दि. 19 नोव्हेंबरते 24 नोव्हेंबर 2017
श्री स्वामीस्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप
‘मुनीनांसप्तकोटीणांवरदंभक्तवत्सलां। दुष्टमर्दनदेवेशवंदेहंम्हालसापती॥
हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी-कुंकूस्वत:च्या कपाळी लावावे.
खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.
1) ॐ ऐं आत्मतत्वंशोधयामीनम: स्वाहा।
2) ॐ र्हीं विद्यातत्वंशोधयामीनम: स्वाहा।
3) ॐ क्लीं शिवतत्वंशोधयामीनम: स्वाहा।
4) ॐ ऐं र्हीं क्लीं सर्वतत्वंशोधयामीनम: स्वाहा।
गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.
संकल्प : ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्ती साठी, वर्धना साठी, सर्वदुरीत उपशमनासाठी अशुभशक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकलग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविधताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड-अचंचल-अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे.’
श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.
‘ॐ श्री गंगा-म्हाळसासहीतमणिमल्हारयेनम:’ या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.
1) घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे, चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीपप्रज्वलितकरून त्याची पूजा करावी.
2) एक वेळूची टोपलीत्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी.
3) त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहावेढे देऊन ठेवावा. त्यातपाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची पाच पाने व आंब्याचा डहाळाला वावा.
4) घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतर ते हळदीचे गंध लावावे, घटावर एकातांब्याच्या अथवा स्टिलच्या ताटलीत तांदुळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे.
5) खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी.
ध्यान
ध्यायेन्मल्लारिदेवंकनकगिरिनिभं म्हाळसाभूषिताङकम्।
श्वेताश्वंखड्गहस्तंविबुधबुधगणै: सेव्यमानंकृतार्थे:॥
युक्तांघ्रिंदैत्यमूर्ध्निडमरुविलसितंनैशचूर्णाभिरामम्।
नित्यंभक्तेषुतुष्टंस्वगणपरिवृतंनित्येमोंकाररूपम्॥
म्हणून टाकास नमस्कार करावा.
खंडोबाच्याटाकावर 1 वेळा श्री सूक्त व एक वेळा रुद्र अथवा शिवमहिम्न म्हणून अभिषेक करावा.
घटावर विड्याची दोनपाने पुर्वेकडे देठकरून ठेवावी, त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा.
टाकाची पंचोपचार पूजा करावी.
पंचोपचारपूजा :
1) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।विलेपनार्थे चंदनम्समर्पयामि॥ (गंधलावावे.)
अलंकारार्थे अक्षताम्समर्पयामि॥हरिद्रां कुंकुम्सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि॥
(गंधलावावे, अक्षतावहाव्यातवहळद-कुंकूवहावे.)
2) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।ऋतुकालोद्भवपुष्पम्समर्पयामि॥ (फुलेवहावीत.)
3) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।
धूपम् आघ्रापयामि॥ (धूपओवाळावा)
4) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।दीपंदर्श यामि। (दीपओवाळावा.)
5) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।पंचामृतात्मकं नैवेद्य समर्पयामि॥
(पंचामृतवाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.)
पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने बांधावी.
‘ॐमांमालेमहामायेसर्वशक्तिस्वरूपिणी।
चतूर्वर्गत्वयीन्यस्तेस्तन्मान्मेसिद्धिदाभव॥’
पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी.
रोज घटावरील टाकाची दूरूनच पंचोपचार पूजा करून, टाकास हळद वाहावी व घटासरोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी, आरती करावी.
सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे.
चंपाषष्ठी (स्कंदषष्ठी)
दि. 24 नोव्हेंबर 2017
चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटाध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे.परंपरेनुसार कुलाचार व कुल धर्म पूर्ण करून,तळीभरून महानैवेद्यत्यात बाजरीची भाकरी, नव्यावांग्याचे भरीत,पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी.
तळीभरणे कुळधर्माच्या वेळी नैवेद्यदाखविण्यापूर्वी तळीभरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात. पाचमुलांनी हात लावून ताम्हणवर उचलून त्यावर तीनवेळा कपाळटेकवतात व ‘येळकोटमल्हार, सदानंदाचायेळकोट, म्हाळसाकान्त कडेपठारकी जय’असा जय जयकार करतात. तसेच काही प्रदेशात
सदानंदाचायेळकोट, येळकोटमल्हारयेळकोट।हरहरमहादेव।चिंतामणमोरया।
भैरोबाचाचांदोबा।अगडबंबनगारा।सोन्याचीजेजुरी।मोत्याचातुरा।निळाघोडा।पायीतोडा।
कमरकरगोटा।बेंबीहिरा।गळ्यातकंठी।मोहनमाळा।डोईवरशेला।अंगावरशाल।
सदाहिलाल।जेजुरीजाई।शिकारखेळी।म्हाळसासुंदरी।आरतीकरी।देवाओवाळी।नानापरी।देवाच्याशृंगारा।कोटलागोशिखरा।खंडेरायाचाखंडका।
भंडाराचाभडका।बोलसदानंदाचायेळकोट।
असे म्हणतात. हेम्हणताना हातात दिवटी-बुधली असते. विवाहा पूर्वीचा कुलधर्म असेल, तर भाऊबंदांनीही त्यांच्या दिवट्या आणावयाच्या असतात. नंतर वरील प्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या-बुुधल्या घेऊन थोडे जायचे असते (किमान 5 पावले). त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकारकरून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य, पुराणाच्या 14 दिव्यानी आरती करावी, जमल्यास धनगर जोडप्यास जेऊ घालावे.
षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी, जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी.