दैनंदिन कार्यक्रम
* सकाळी 5.00 ते 7.30 श्री गुरुचरित्र वाचन
* सकाळी 8.00 वा. भूपाळी, आरती
* रोज सकाळी 8.30 ते 10.30
श्री दुर्गासप्तशती व श्री स्वामीचरित्र पठण 1 माळ श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप
* सकाळी 10.30 ला नैवेद्य आरती
(मंत्रपुष्पांजलीसह)
* सकाळी 10.45 ते 12.30
श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पठण
* दुपारी 12.30 वा. भोजनाचा कार्यक्रम
* दुपारी 2 ते 5.30 श्री दुर्गासप्तशती व श्री स्वामी चरित्र पठण
* सायंकाळी 5.30 ते 6.00 औदूंबरप्रदक्षिणा
* सायंकाळी 6.00 वा. आरती
* सायं 6.30 तेरात्री 8.00
पुढील प्रमाणे नित्य सेवा करावी.
* श्री स्वामी समर्थ 1 माळ सामुदायिक जप
नित्यध्यान
* गीतेचा 15 वा अध्याय
* गीताई, मनाचे श्लोक वाचन
* पसायदान, तुकारामाचा अभंग
* विष्णुसहस्त्रनाम वाचन
* श्री स्वामी समर्थ एक माळजप
श्री दत्त जयंती उत्सव
(दिंडोरीप्रणीतउत्सव)
मार्गशीर्षशु.15 (दि. 3 डिसेंबर 2017)
या दिवशी सर्वत्र दत्त जयंती उत्सव केला जातो. श्री दत्त महाराज हेच आपल्या मार्गा चे मूळ असल्याने हा कार्यक्रम सामुदायिक पणे व खूप भक्तिभावाने करावयाचा असतो. श्री दत्तजयंती-निमित्त सर्वसेवेकर्यांनी उपवास करावयाचे असते व उपवास, दुसर्या दिवशीप्रतिपदेला 10.30 च्या आरती नंतर सोडावयाचा हे प्रथम लक्षात ठेवावे.
या दिवशी केंद्रात नैवेद्य आरती 10.30 वाजता न करता 12.39 नंतर करतात. साधारणसर्व फोटोंची पूजा करून, हार घालून ठिक 12.15 वाजेपर्यंत गुरुचरित्रातील 4 था अध्याय एका सेवेकर्याने सावकाश वाचावा व इतरांनी श्रवण करावा. बरोबर 12.39 ला अध्यायातील वाचनातील (त्यातील “तीन बाळे झाली”, या ओळी नंतर वाचन बंद करावे). त्या वेळी अवधूत चिंतन ‘श्री गुरुदेव दत्त’असा तीन वेळा मोठ्याने जय जयकारकरून आरती करावी.
या दिवशी नैवेद्यात अन्नाचा नैवेद्य न करता फराळाचा उपवासाचा नैवेद्य करावा. सकाळच्या 3 व सायंकाळच्या 2 आरत्या कराव्यात. दुसर्या दिवशी सकाळची 8 चीआरती झाल्यानंतर 10.30पूर्वी श्री सत्य दत्तपूजा करून सर्वांनी 11
माळ जप करावा. अन्नाचे 6 नैवेद्य दाखवून 10.30 ची आरती करून प्रसाद वाटावा.