जिल्हा जालना (महाराष्ट्र) येथे दिनांक १-नोव्हेंबर २०१७ (बुधवार) रोजी प.पू.गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय सत्संग मेळाव्यास जिल्ह्यासह मराठवाडा तसेच विदर्भातून हजारो सेवेकरी भाविक उपस्थित होते.
यामध्ये सामुदायिक तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राज्यातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सामुदायिकरित्या सर्व धर्मीय-जातीय वधू-वर परिचय मेळावे व तुलसी विवाह कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
प.पू.गुरुमाऊली यांचे मार्गदर्शनर हितगुजातील अमृतकण:
१) शक्यतो वधू-वर पालकांनी आपल्या मुला-मुलींची विवाह साखरपुड्यात कमीत कमी खर्चात करावा.
२) विवाह करतांना हुंडा, सोन नाण, मानपान घेतला तर निश्चितच दुःख वाट्याला येणार.
३) सप्तरंगी वनस्पथीने सोयरॅसिस सारखा भयंकर आजार 100% बरा होतो. तसेच कसल्याही प्रकारचा कॅसर बरा होतो.
४) हायब्रीड अन्न खाल्ल्याने शारीरिक सहनशक्ती कमी झालेली आहे.
५) A2 देशी गाईचे दुध शरीराला अतिशय फायद्याचे आहे.
६) माणुस नावाची एकच जात असून माणुसकी नावाचा एकच धर्म आहे.