मकर संक्रांती
पौष कृ.१३ ( दि.१४ जानेवारी २०१८)
संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सवआहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला ‘मकरसंक्रांत’असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला ‘उत्तरायण’ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवना चे संक्रमणही जोडलेलेआहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्यादेखील महत्त्वआहे.
संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत गमन. अशा 12 संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणार्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे मानतात.
सूर्य आणि इतर ग्रहयांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात या चे वर्णन हेमाद्रीनी केलेआहे, सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्राती च्या पूर्वी आणि नंतर 16 घटीकांपर्यंतअसतो. संक्रांतीच्या दुसर्या दिवशी क्रिकांतअसते. या दिवशी कोणत्याही शुभकार्याला आरंभ केला जात नाही. सौराष्ट्रा मध्ये या सणाला ‘उत्तरायण’ असे म्हणतात किंवा ‘उतराण’ म्हणतात या दिवसानंतर सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडाथोडा मोठा होऊ लागतो.
‘संक्रांत’ म्हणजे संक्रमण, पुढे जाणे. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्या वेळेचा हासण आहे. संक्रांती चा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, क्रिकांत हा सण रथ सप्तमी पर्यंत साजरा करण्याची पध्दत आहे.
सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो म्हणून थंडी पडत असते. सूर्य मेष राशीत आला की, त्याचा प्रभाव वाढतो म्हणून उष्ण तापमान असते. मिथून राशी ही कोरडी राशी आहे. सूर्य कर्केत गेलाकी पाऊस पडतो, कन्येत गेला की पाऊस संपतो, दिवस भर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती असते, त्यालाच आपण ‘ऑक्टोबरहीट’म्हणतो.
सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात. मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंबरुपाने पडायला लागतात.
सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर “सा विद्याया विमुक्तये” या आर्य संस्कृतीतील ब्रीदाचे पालन करताना गायत्रीमंत्रापासून अनेक मंत्र, महत्त्वाची स्तोत्रे, ग्रंथवाचण्याची पद्धती, अनेक दुर्लभ उतारे, तोडगे, अतिगंभीर आजारातील उपचार, वाढदिवसाची भारतीय पद्धती यांचे सुबोध संकलन असलेले “नित्यसेवा” नावाचे अनमोल भांडार लुटले जाते. ज्ञानदानासारखे श्रेष्ठदान कोणतेच नाही, हे वरील विवेचनावरून सर्वांना समजावे. या दिवशी ऐपती प्रमाणे “श्री स्वामी चरित्र, श्री दुर्गा सप्तशती, श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ भक्ती सार, श्री भागवत, श्री स्वामी समर्थ सेवा, विवाह संस्कार, ज्योतिषशास्त्र, मृत्यु नंतर चे संस्कार, क्षात्रधर्म, हिंदूधर्म, मराठी अस्मिता, आयुर्वेद (घरगुती)” असे उपलब्ध ग्रंथ लुटण्यास (वाटण्यास) हरकत नाही. संक्रांत काळात सुवासिनींना दान करतांना पुढील संकल्प करावा.
ःसंकल्प :
(देश, काल कथन करून नंतर)
‘मम् आत्मन: सकलपुराणोक्त फलप्राप्त्यर्थ श्री सवितृनारायण प्रीतिद्वारा सकल-पापक्षयपूर्वकं, स्थिरसौभाग्य, कुलाभिवृद्धि, धनधान्य समृद्धिदीर्घायु: महैश्चर्य मंगलाभ्युदय, सुखसंपदादि कल्पोक्त फलसिद्धये अस्मिन मकरसंक्रमण पुण्यकाले नानानाम गोत्राभ्य:सुवासिनीभ्य: दातुमहमुत्सृज्ये।’
वरील संकल्प सोडल्या वर दान वस्तू चे पूजन करावे व नंतर दान करावे.
सर्व केंद्रांवर भगवान श्री स्वामी समर्थांना प्रत्येकाने आणलेला तिळ गुळाचा नैवेद्य दाखवून विश्वाचे चालक, मालक, पालक भगवान श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून तिळ गूळ वाटावेत.
रथसप्तमी (भानुसप्तमी) पर्यंत हळदी-कुंकू समारंभ करतात. रथ सप्तमीस तत्त्वरूपाने दूध तापवून ऊतू घालवून नैवेद्य दाखवितात.
भारतीय संस्कृतीत हा एक पर्वणीचा म्हणजे उत्तम संधीचा दिवस मानतात. भगवान श्री स्वामी समर्थांच्या दिंडोरीप्रणीत सर्व केंद्रांवर अशीही उत्तमसंधी (पर्वणी) ज्ञानदानानेच साधलीजाते, की ज्या ज्ञानामुळे मृत्यूसारख्या समस्यावसंकटांवरसुद्धा मात करता येते. भगवान श्री स्वामी समर्थांचा हा कृपा प्रसाद सर्वांना मिळतो.