वसंतपंचमी
माघ शु.5 (दि.22 जानेवारी 2018)
वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी 8.00 वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्यांनी त्यांच्या मुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरतीनंतर एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्री सरस्वती मातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करून श्री महासरस्वती मातेच्या “ऐं” या बीज मंत्राचा 11 माळी सामुदायिक जप करावा. या जपानंतर सर्व सेवेकर्यांनी आपल्या मुलाच्या जिभेवर मधाने दर्भाच्या काडीने (किंंवा हाताच्या बोटाने) “ऐं”हा बीज मंत्र लिहावा व सर्वांनी माता श्री महा सरस्वती व श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून बालकांची बुद्धी वाढविण्याची प्रार्थना करावी.