* श्री गुरूदत्तात्रेयांचा ग्रंथ अर्थात श्रीगुरुचरित्र जेथे वाचला जातो तेथे श्री गुरूदत्तात्रेयांना यावेच लागते, हे त्रिकाला बाधीत सत्य आहे.
* आध्यात्मिक सेवा, भक्ती या मार्गाने सर्वत्र पोहचवून सेवेचे विकेंद्रीकरणच साध्य केले आहे.
* गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी हे भक्तीचे विकेंद्रीकरण होय.
* कोणत्याही मनुष्याला आत्मप्रौढी नसावी, मी केले, माझ्यामुळे झाले, मी आहे म्हणून सर्व चालले आहे असे विचार चुकूनही मनात येऊ देऊ नये. आपली इच्छा प्रदर्शित न करता, स्वामींच्या इच्छेत इच्छा मिसळून रहावे. आपण कोणीही नसून सर्व कर्ते करविते केवळ स्वामी आहेत. आपल्या आजुबाजूच्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे.
* ज्ञानयुक्त भक्तीकडे पोहचविणारे माध्यम अर्थात ग्रंथ होय. आज ग्रंथालयांना बळकटी देण्याची नितांत गरज आहे.
* जो जो भेटेल भूत, त्यासी मानावा भगवंत।
अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक जानेवारी २०१८ संपर्क.(०२५५७)२२१७१०