होळी (फाल्गुन शु.१५) (दि. १ मार्च २०१८)

वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरु होत असतो, जमीन भाजून निघते. तिच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानाची कुजलेली घान तशीच असेल तर ती आरोग्याला हानीकारक असते, म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही. पुन्हा पुन्हा करावी लागते, त्यांची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापुर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन.

हा सण कसा साजरा करतात ?
या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे, गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरण पोळीचा नैवेद्य दाखवावा. खेडेगावात सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात, नंतर त्यात नारळ अर्पण करतात. खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात. प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत चोटी होळी पेटवावी. नंतर हातात पाणी घेऊन “मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो” असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचार पूजा करावी व् नैवेद्य द्यावा.
“असृक्पाभयसंत्रस्तैः कृत्वा त्वं होलि बाहलशैः I
अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव I I”
असा मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा. तसेच घरात त्रास देणाऱ्या जीव किटकांच्या (झुरळे, डास, ढेकूण वगैरे) कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात. म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात. होळी या सणाच्या निमित्याने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणांचा संदेश.
“जुने जाऊ द्या मरणा लागुनी I
जाळुनी किंवा पुरून टाका I I