पापमोचनी एकादशी: प.पू. गुरुमाऊली यांना अभिष्टचिंतन (जन्मदिनाच्या) सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

थोडक्यात प.पू.गुरुमाऊली यांचा कार्य परिचय:

सद्गुरू मोरेदादांच्या महानिर्वाणानंतर लाखो सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा विजय ध्वज सतत उंचवत ठेवलेला आहे. समाजातील विविध समस्यांचा बारकाईने अभ्यास करून प. पू. गुरुमाऊलींनी “सेवेकऱ्यांचे ग्रामअभियान” सुरु केलेले आहे.

या ग्रामअभियानात समाजातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी १६ सूत्री  विविध विभागांची निर्मिती केली ती याप्रमाणे…

१) बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग
२) प्रश्नोत्तरे विभाग 
३) विवाह संस्कार विभाग
४) आरोग्य व आयुर्वेद विभाग
५) कृषीशास्त्र विभाग
६) भारतीय संस्कृती व अस्मिता विभाग
७) कायदेशीर सल्लागार विभाग
८) वास्तुशास्त्र विभाग
९) याज्ञिकी विभाग
१०) स्वयंरोजगार विभाग
११) प्रशिक्षण विभाग
१२) पर्यावरण प्रकृती विभाग
१३) पशु-गौवंश विभाग
१४) माहिती व तंत्रज्ञान विभाग
१५) प्रशासकीय विभाग
१६) देश विदेश अभियान विभाग

या १६ सूत्री ग्रामअभियानाद्वारे मानव घडविणे, सन्मार्गाला लावणे आणि राष्ट्राचा विकास साधने याप्रमाणे कार्य सुरु आहे. मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म अशी शिकवण या सेवामार्गातून प.पू. गुरुमाऊली कोट्यावधी सेवेकऱ्यांना देत आहे. अध्यात्म व विज्ञानाची अनोखी सांगड घालून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे व प्राचीन शास्त्रांचा, ग्रंथांचा अभ्यास करून नवनवीन संशोधन करण्याचे काम या विभागांद्वारे सुरु आहे. कोणतीही समस्या / प्रश्न असो त्यावर संबंधित विभागातून विनामुल्य मार्गदर्शन मिळते.

उदा. शेतीच्या समस्यांबाबत कृषीशास्त्र विभागातून विनामुल्य मार्गदर्शन व प्रशिक्षणही मिळते; विवाह संस्कार विभागाद्वारे विवाहपूर्व व विवाहोत्तर समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते इत्यादी.

शेतकऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान देणे गरजेचे आहे आणि एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला आपला अनुभव सांगितल्यास तो लवकर पटतो म्हणूनच गुरुमाऊलींनी शेतामध्येच शेतकऱ्यांना एकत्र करून नैसर्गिक व सेंद्रिय विविध प्रयोग करून दाखविले. रासायनीक शेतीपेक्षा नैसर्गिक व  सेंद्रिय शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाची “गुणवत्ता आणि सात्विकता” कशी चांगली असते हे शेतकऱ्यांना स्वत: सेंद्रिय शेती करून दाखविले आहे. दिंडोरी येथे स्वत: गुरुमाऊली यांनी आध्यात्मिक शेती हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. पिकांना, गायींना विविध वेदोक्त मंत्र, ऋचा विविध शास्त्रीय संगीतातील राग, मंदिरातील अभिषेकाचे तीर्थ, शेतीमध्ये केलेल्या अग्निहोत्राची रक्षा अशा नानाविध बाबींचा शेतीतील उत्पदनावर होणारा चांगला परीणाम हे प्रत्यक्ष कृतीतून घडवून सांगितला आहे. आजही दिंडोरी येथे भेट देऊन आपण ही आध्यात्मिक व सात्विक शेती आपण पाहू शकता. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे शाश्वत सूत्र आहे. परंतु सध्याच्या काळात हा क्रम थोडा बदलला आहे, यामध्ये शेती मागे पडली आहे. म्हणूनच आजच्या सुशिक्षित युवापिढीने पुन्हा हे सूत्र दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. असा गुरुमाऊलींचा आजच्या तरुणवर्गास संदेश आहे.