खग्रास चंद्रग्रहण आषाढ शु.१५, शुक्रवार, २७/२८ जुलै २०१८

ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया खंड, अमेरिका, युरोप, आफ्रीका खंड, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड,पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर.

स्पर्श
ग्रहण सुरुवात : २७ जुलै  – रात्री २३:५४
मध्य रात्री : ०१:५२
२८ जुलै : समाप्ती पहाटे 03:49
२८ जुलै : पर्व
एकूण कालावधी  ०३:५५

(वरील वेळा संपूर्ण भारतासाठी आहे)

हे ग्रहण भारतात सर्वत्र खग्रास दिसणार आहे.

पुण्यकाल– ग्रहण स्पर्श ते समाप्तीपर्यंतचा काल पुण्यकाल आहे.
वेधारंभ– हे ग्रहण रात्रीच्या दुसर्‍या प्रहरात असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे दु.12.45 पासून ग्रहण समाप्तीपर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात भोजन करु नये.
स्नान, देवपूजा, श्री स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशतीची पारायणे करण्याकरता उत्कृष्ट मुहूर्त, याशिवाय नित्यकर्मे, जपजाप्य, श्राध्द ही कर्मे करता येतील. बाल,आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी 05:30 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.
ग्रहणातील कृत्ये – ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण श्राध्द, जप, होम, दान करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषय सेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुध्दी असते.

(गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये.)