प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (ऑगस्ट २०१८)

* मुलांचे वाढदिवस हिंदू जन्मतिथीने करावेत. केक वगैरे कापून अन्नावर सुरी न फिरवता, दिवे न विझविता औक्षण करुन रामरक्षेचे पहिले दहा श्लोक म्हणून त्या-त्या अवयवांवर अक्षता टाकून वाढदिवस साजरा करावा.

* मुलामुलींनी सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्राम्हमुहूर्तावर उठून अभ्यास करावा. कारण पहाटे तुळशीसारख्या वनस्पती ओझोन वायू सोडतात. त्यामुळे अभ्यास ग्रहण करण्याची शक्ती वाढते.

* सरस्वतीची उपासना, शुभं करोति, मनाचे श्‍लोक, गायत्री मंत्र जप आजचे विद्यार्थी करत नाहीत. विद्यार्थ्यांच्या जीभेवर सरस्वतीचा वास रहावा या हेतूने वसंत पंचमी किंवा कुठल्याही महिन्याच्या शुद्ध पंचमीस मुलांच्या जिभेवर सोन्याचे किंवा दर्भाच्या काडीने, मधाने सरस्वतीचा बीज मंत्र ‘ऐं’ हे अक्षर लिहावे व ‘ऐं’ या मंत्राचा एक माळ जप करावा.

* मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. मुलांना वयाच्या १८ वर्षापर्यंत दिवसातून ३ वेळा जेऊ घालावे. ताज्या हिरव्या भाज्या, कच्च्या भेंड्या, टोमॅटो खायला द्यावीत. बेकरीचे तसेच तेलकट पदार्थ देऊ नये. कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.

* नैराश्येमुळे मुलामुलींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. अशा मुलामुलींना पंचगव्य प्राशन करायला लावावे त्यामुळे विचारात बदल होतो.

* बुद्धी वाढण्यासाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष तसेच साहस, शक्ती येण्यासाठी मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, पाठांतरासाठी मनाचे श्‍लोक व मंत्र जप मुलांना करायला सांगावे.

अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक ऑगस्ट २०१८. संपर्क(०२५५७)२२१७१०