श्रावण (श्रावण शु.1) (दि.12 ऑगस्ट 2018)

आषाढ शु. एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत, आषाढ पौर्णिेपासून कार्तिक पौर्णिेपर्यंत होणार्‍या चार महिन्यांच्या काळासn ‘चार्तुास’ असे म्हणतात.

मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. ‘दक्षिणायण’ ही देवांची रात्र असून

‘उत्तरायण’ हा त्यांचा दिवस असतो. आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ असे म्हणतात. कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे व कार्तिक शुद्ध एकादशीस (प्रबोधिनी एकादशीस) उठतात, जागे होतात. वस्तुत: एकादशी पर्यंत चारच महिने पूर्ण होतात, याचा अर्थ असा की, एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात व आपले व्यवहार करू लागतात. देवांच्या निद्राकालात असूर

प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काही तरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते.

नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता विष्णू निष्क्रिय असतो. म्हणून चार्तुासात भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात असे समजले जाते म्हणून या कालावधीत विवाहादी विधी करणे वर्ज्य आहे. पावसाचा भर असल्यामुळे ङ्गारसे स्थलांतर घडत नाही, त्यामुळे चार्तुास व्रत एकस्थानी राहुनच करावे असा प्रघात पडला. चार्तुासातील चारही महिन्यात बरेच सण, धार्मिक उत्सव व व्रते असतात. चार्तुासातील श्रावण महिना विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात. आई वडिलांनी आपल्या मुलांना कुलाचार शिकविणे, देवगुरुंचे दर्शन, पूजन तसेच अभक्ष्य पदार्थ न खाण्याचे वळण लावणे हा चार्तुास काळाचा उद्देश आहे.

* श्रावणमास *

श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोवारी शिवमूठ वाहिली जाते.अभिषेक, पठण, हो-हवन, उपवास, व्रत केले जातात. त्यात निराहार व्रत, एकान्नव्रत, नक्त व्रत, मौनव्रत, कर्पूरहो, दानधर्म, सत्संकल्प केले जातात. या महिन्यात दर शुक्रवारी जिवतीकाचे पूजन केले जाते, सौभाग्यदायक ‘मंगळागौरी उत्सव’ साजरा केला जातो. शिव-पार्वती, गणेशाचे पूजन करतात. हा महिना प्राणीमात्रांवर दया करण्यास सांगणारा, त्यांची कृतज्ञता मानून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे. म्हणून या महिन्यात नागपंचमी, बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो तर सागराशी संबंधीत नारळी पौर्णिा साजरी करण्यात येते. बहिणभावाचे पवित्र प्रेाचे बंधन ‘राखी पौर्णिा’ हा सणही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तर संस्कार करणारा ‘श्रावणी’ संस्कार साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

श्रावण मासातील व्रत वैकल्ये :

श्रावण महिन्यात अनेक धार्मिक व्रते आचरता येतात.

1) नक्तव्रत : दिवसा उपवास करून पूर्ण श्रावणमास दररोज नक्तव्रत म्हणजे ङ्गक्त सायंकाळी आहार घेणे. ज्यांना पूर्ण निरंकार शक्य नाही त्यांनी उपोषणाचा एखादा पदार्थ खाऊन एकदा पाणी घ्यावे. भगवान शिवाबरोबर प्रत्येक वारानुसार त्या-त्या देवतेचेही पूजन करावे.

2) दर श्रावण सोवार उपवास : उपवास सायंकाळी सोडणे.

3) दर शनिवार : उपवास सायंकाळी सोडणे.

4) दुर्वा गणपती व्रत : हे तीन किंवा पाच वर्षांचे व्रत आहे. सर्वतोभद्र मंडलावर गणपतीची स्थापना (सुपारी) करून त्यांना दुर्वा, बेल, आघाडा, शमी, मंदार वहावे. गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, गणेशमंत्र म्हणावा.

5) सुपोदन वर्ण षष्ठी : पानावर तांदूळ व वाण ठेवून स्त्रियांनी वाण द्यावे व जलाशयात सोडावे.

6) संकष्टी चतुर्थी : या व्रताचा प्रारंभ श्रावणातील अथवा माघातील संकष्टी चतुर्थी पासून करावा.

7) श्रावण महिन्यात ‘‘श्री नवनाथ भक्तिसार’’ या ग्रंथाचे पारायण करावे अथवा रोज एक-दोन अध्याय वाचून 1 महिन्यात पारायण पूर्ण करावे.

8) तसेच ‘सुलभ भागवत’ या ग्रंथाचे देखील पारायण करावे. सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर भगवान शंकराचे पिंडीवर दररोज सर्व स्त्रीपुरू ष, सेवेकरी संस्कृत/मराठी रूद्र, शिवकवच, शिवमहिम्न, स्तोत्र, मंत्र म्हणून रूद्राभिषेक करतात.

दररोज नियमित वेळ ठरवून अभिषेक करतात. साखळी पध्दतही वापरतात. सायंकाळी बिल्वपत्र सर्वांच्या वतीने एक जण वाहतो. शेवटच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर दही-भात लेपन करून प्रत्येक जण 108 बिल्वपत्र सामुदायिक 108 शिवनामावली घेऊन वाहतात. या दिवशी नैवेद्यास चुरम्याचे लाडू असतात. आरतीनंतर नैवेद्य, प्रसाद, लाडू, दहीभात लेपनाचा प्रसादही वाटतात. संपूर्ण

महिनाभर अवर्णनीय स्वर्गतुल्य आनंद देणारी सेवा करायला मिळते. अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग 1 बघावा.