नागपंचमी (श्रावण शु. 5) दि. 15 ऑगस्ट 2018

या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे नाग देवतेची पूजा व नैवेद्य करावा. या दिवशी सहसा काही चिरत, दळत, कांडत नाही. तवा चुलीवर ठेवत नाही. उकडी पदार्थ, मोदक, कानवले खातात. या दिवशी कुणाचीही हिंसा करू नये. नागाच्या प्रतिमेला दूध, लाह्यांचा नैवेद्य या दिवशी दाखवतात. पृथ्वीवर ङ्गक्त एकच दिवस नागाची पूजा होते. इतर वेळी त्याची प्रतिमा, मूर्ती घरात पूजत नाही. कारण पृथ्वी शेषनागाने डोक्यावर धारण केली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये.