स्वातंत्र्य दिन (राष्ट्रीय सण) श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी येथे संपन्न

भारतीय स्वातंत्र्याचा मंगलमय दिवस म्हणून १५ ऑगस्ट साजरा केला जातो. भारतमातेची सेवा म्हणून सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दुर्गा सप्तशतीचे सामुदायिक पठण होते. रक्तदान, श्रमदान, ज्ञानदानाचेही कार्यक्रम सर्व केंद्रात सामूहिक स्वरूपात घेतले जातात. यादिवशी श्री गुरुपीठातहीध्वजारोहण सोहळा साजरा केला जातो.

श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी दरबार येथे प.पू. गुरुमाऊली यांच्या हस्ते सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण ध्वजवंदना करण्यात आली. यावेळी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या ५०००+ सेवा केंद्रात दैनंदिन सेवेमध्ये राष्ट्र उद्धारासाठी भारत मातेची सेवा रुजू केली जात आहे.  तसेच दैनंदिन सेवेमध्ये भारत मातेची अति उच्चकोटीची सेवा “श्री दुर्गा सप्तशतीचे पठन” करून सेवा रुजू करावी असे प.पू.गुरुमाऊली यांनी हितगुजात  सांगितले.