नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) (श्रावण शु. १५) : दि. २६ ऑगस्ट २०१८

या दिवशी सर्व श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात भगिनींनी श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करून तेथे जमलेल्या आपल्या प्रत्येक सेवेकरी बंधूंना राखी बांधावी. यामुळे तत्वरूपाने एक मोठे संरक्षणाचे नाते तयार होते. राखी बांधत असतांना खालील मंत्र म्हणत बांधावी.

येन बध्दो बलीराजा दानवेंद्रोहाबला: ।

तेन त्वामहम् (बन्धयामि) रक्षे माचलमाचल ॥

ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा या नावानेही ओळखली जाते. या पौर्णिेस समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्रास विधीपूर्वक नारळ अर्पण करतात.