प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (सप्टेंबर २०१८)

* जी गोष्ट स्वामींना अभिप्रेत आहे व भूषणावह आहे त्यालाच तर ‘ग्रामअभियान’ असे संबोधले जाते.

*‘अक्कलकोट’ अर्थात अक्कलेचे कोट अर्थात ‘‘विचार करा, कामाला लागा!’’

* मूल्यसंस्कार विभागाच्या माध्यमातून सांगायचे झाल्यास- प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे नित्य पठन केल्यास निश्‍चितच त्यांच्या बुद्धीमत्तेत व अनुषंगाने अभ्यासात उचित परिणाम जाणवतो, बाल वयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे स्तोत्र आपल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले तरी चालते.

* काही वाटायचे असल्यास सुख वाटावे! सुखाचे वाटप केल्यास दु:ख आपल्यापर्यन्त येणारच नाही. ‘मी सुखी आहे’ असे म्हणणारी व्यक्ती नेहमी सुखीच दिसत असते, तर ‘मला हे दु:ख आहे, ते दु:ख आहे’ असे म्हणणारी व्यक्ती ही नेहमी दु:खी, उदासिनच दिसत असते. त्यामुळे सदोदित आनंदी, समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.

* मानवी पोट हे कचराकुंडी नाही! तेव्हा जे योग्य व पचण्यास चांगले असते तेच अन्न पोटात टाकावे.उगाच बेकरी पदार्थ, फास्ट्फूड खाण्याच्या सवयी स्वत:स लावू नयेत.

* प्रत्येक सेवेकर्‍याने ‘जर आधी लोकांची कामे केली तर स्वामी महाराज नक्कीच तुमची कामे करतील,’ या उक्तीवर विश्‍वास ठेवून, इतरांना अग्रक्रम देऊन, त्यांच्या समस्या जाणून, त्यांना सेवेच्या प्रवाहात सामिल करून घेऊन, दिव्याने दिवा- ज्योतीने ज्योत प्रकाशमान केली तर माणूसकीची संस्कृती येण्यास वेळ लागणार नाही.

* एक सरपंच म्हणजे एक अवघे गाव असते! तेव्हा सरपंचानेच जर हे कार्य व्यवस्थित केल्यास गावाचा विकास नक्कीच साध्य होत असतो.

अधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक सप्टेंबर २०१८. संपर्क(०२५५७)२२१७१०