भाद्रपद शुध्दचतुर्थी अथवा गणेश चतुर्थी याच दिवशी हा कार्यक्रम असतो. आपल्या सर्व केंद्रात जी सेवा पध्दत आहे ते नित्य नियम, आरत्या वगैरे सर्वांचे मूळ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीमहाराज आहेत. ही वाटचाल ज्या सद्गुरू प. पू. पिठले महाराजांनी सुरू केली त्यांचे सद्गुरू श्रीपाद श्रीवल्लभ होते. या दिवशी सकाळची आरती झाल्यावर पुढील प्रमाणे सेवा करावी. श्रीपाद श्रीवल्लभांच्या फोटोची मांडणी करून पूजा करावी. श्री गुरूचरित्र ग्रंथाचा ५ वा अध्याय वाचावा, सर्वांनी श्रवण करावा. नंतर ११ माळ जप ‘श्री स्वामी समर्थ’ व ठीक १०:३० ला ६ नैवेद्य करावे.
क्रम
१) कुलदेवता २) श्री नारायणांचा ३) श्री दत्त महाराजांचा ४) श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा ५) श्री स्वामी समर्थांचा ६) श्री गायत्री मातोश्रींचा असे नैवेद्य दाखवून आरती व प्रसाद करावा.