हरतालिका (भाद्रपद शु. ३) (दि.१२ सप्टेंबर)

 

श्रावणापासून सणांना जी सुरूवात होतेती असते दिवाळीपर्यंत. दिवाळीनंतर असणारा ऋतू इतका सुंदर व आल्हाददायक असतो की, वसंतऋतूच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सणही एक पर्वणीच असते. भाद्रपद महिन्यात येणारे ‘हरतालिका व्रत’ हे वर्षाऋतूत येते. वटसावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते. त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे. या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते, तिचा पिता दक्षप्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वत:ला जाळून घेतले व नंतर तीहिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करून ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली. अशी ही दृढनिश्‍चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती, आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे असते आणि स्वत:चे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते.

* पूजेचे साहित्य :- हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, नारळ, २ केळी, इतर डगळे, विड्याची पाने १२ सुपार्‍या १०, खारका ५, बदाम ५, कापसाची वस्त्रे, कापसाच्या वाती, जानवे, पंचामृत, अक्षता, निवडलेले धुऊन वाळवलेले तांदुळ, अष्टगंध, शेंदूर, बुक्का, अत्तर, सुगंधी तेल, कोट पाणी, कापूर, सुटे पैसे इ.

* सौभाग्य अलंकार :- बांगड्या, गळेसरी वगैरे, ङ्गुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती.

* फुले:- चाफा, केवडा, कन्हेर, बकुळ, कमळ, शेवंती, जास्वंद, मोगरा.

* पत्री:- अशोक, आवळी, दुर्वा, कन्हेर, कदंब, ब्राह्मी, आघाडा, बेल व इतर

* पूजा सर्व सेवेकरी भगिनींनी या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करावे (पांढरे तीळ व आवळा एकत्र वाटून त्याचे उटणे तयार करावे) या दिवशी उपवास करावा. नंतर दुपारी सेवाकेंद्रात चौरंग मांडूनत्यावर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंग तयार करून मांडावीत नंतर षोडशोपचार पूजा करावी. पूजा करत असतांना ‘उमामहेेशर देवताभ्यो नम:’ हा मंत्र म्हणावा व संपूर्ण पूजा हरतालिका ग्रंथाप्रमाणे करावी.

स्त्रियांच्या अनेक व्रतांध्ये हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरतालिका व्रत आचरण करून कठोर तपश्‍चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली. त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते. कुमारिका व सौभाग्यवती, विधवा सर्व स्त्रिया हे व्रत करतात. विधवा स्त्रिया भक्त उपवास करतात.