मातृदिन, वृषभ पूजन दिन. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने बैलास या दिवशी स्वच्छ धुवून, सजवून, ओवाळून, पुरणपोळीचा नैवेद्य खावू घालतात. वर्षभर शेतात आपल्यासाठी कष्ट करणार्या बैलांसाठी कृतज्ञतादिन म्हणून हा दिन साजरा केला जातो. प्रत्येक आत्मा परमेश्वर स्वरूप आहे हेच आपल्याला आपले सण जाणीव करून देतात. या दिवशी केंद्रात भगवान शंकरांची विशेष सेवा म्हणून दहिभात लेपनाचा व बिल्वपत्र वाहण्याची विशेष सेवा घेतली जाते. हा उत्सव सायंकाळी आरतीच्या अगोदर साजरा केला जातो.