श्रीकृष्ण जन्माष्टमी (श्रावण कृ.७) (दि. २ सप्टेंबर)

या दिवशी आपण आपल्या सेवाकेंद्रात रात्री ठिक १२:३९ वाजता श्रीकृष्णांचा जन्मोत्सव करावा. एका छोट्या पाळण्यात श्री बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी व पाळणा म्हणावा. सायंकाळी ६:३० च्या आरतीनंतर केंद्रात सर्व सेवेकर्‍यांनी एकत्र जमून गाणी, कूट प्रश्‍न, खेळ, श्रीकृष्णांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग, श्रीमत भगवत् गीतेचा १५ वा अध्याय व गीतेची १८ नावे सामुदायिकरित्या वाचन करावे. रात्री १२:३९ वाजता जन्मोत्सव साजरा करून सुंठ खडीसाखरेचा नैवेद्य करतात. दुसर्‍या दिवशीदहीहंडी साजरी केली जाते व गोपाळकाल्याचा नैवेद्य दाखवतात. श्रीकृष्णाचा मंत्र १ माळ जपावा. श्रीकृष्ण किलकम् सुध्दा या दिवशी वाचावे. (ज्ञानदान भाग ३ मध्ये श्रीकृष्ण किलकम दिलेले आहे.)

श्रीकृष्णाचा मंत्र क्लीं कृष्णाय गोविन्दाय गोपी जन वल्लभाय स्वाहा ॥

श्रावण कृष्ण १ ते ८ श्रीकृष्ण नवरात्र उत्सव साजरा करतात. भारतभर आपल्या पूर्ण पुरुषोत्तम दैवताचे विविध प्रकारातून स्मरण करतात. याच दिवशी कालिकेचा जन्मदिनही साजरा केला जातो.