परमपूज्य गुरुमाऊली साप्ताहिक हितगुज: दिंडोरीदरबार

 

* प्रति महिन्यात संपन्न होणार्‍या मासिक सत्संगात आता विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जसे पितृपंधरवाड्या आधी संपन्न झालेल्या सत्संगात आपण सामुदायिक स्वरूपात तर्पणविधी केला त्याचधर्तीवर येथून पुढे सण-वार-व्रत- वैकल्यांनुसार त्या त्या आध्यात्मिक सेवा सामुदायिक स्वरूपात श्री गुरुपीठात संपन्न होतील.

* आजच्या मासिक सत्संगात दिवाळी सणानिमित्य श्रीयंत्र पूजनविधी संपन्न होईल. अशाप्रकारे सर्वांना सेवेचा दिर्घकाल लाभ घ्यावा हाच त्यामागचा उद्देश आहे. श्री स्वामींनीच हे ठरवले आहे की माझ्या समर्थ सेवेकर्‍यांना स्वास्थ्य, आनंद लाभावे म्हणून अध्यात्मातून सर्वांना राष्ट्रभक्तीकडे नेण्याला प्राधान्य मिळेल.

* देशात घडणार्‍या काही चांगल्या घटना ह्या सेवेकर्‍यांच्या सेवेमुळे घडत असतात.

* वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींना तडे नकोत, घरात फुटकी भांडी, बंद पडलेली घड्याळे, फुटके काच, आरसे, जुन्या वापरलेल्या चपला, जुने कपडे अशा नानाविध वस्तू अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या असतात ज्या वस्तूंचा वापर कधीही केला जात नाही, अशा वस्तू घरात जमा करून ठेवल्यास त्या वास्तूत नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तेव्हा अशा वस्तुंची तात्काळ विल्हेवाट लावावी.

* घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावे. जाळे-जळमट, धूळ, अस्वच्छता, कचरा दारासमोर नको; माता लक्ष्मी ह्याच प्रवेशद्वाराने आपल्या वास्तुत प्रवेश करणार आहेत.

संपूर्ण हितगुज पाहण्यासाठी येथे क्लिक करा: व्हिडीओ पहा