श्री गायत्री माता उत्सव(दिं. प्र. उत्सव) (अश्‍विन शु. ९ – दि.१८ ऑक्टों)

श्री गायत्री मातागायत्री मंत्र हे आपल्या आर्य धर्मांचे मूळ अधिष्ठान असून आपल्या सेवामार्गाची मूळ देवता आहे. त्यांचा उत्सव वर्षातून ङ्गक्त एकदाच होतो, तो म्हणजे आश्‍विन शुक्ल नवमी. ठिक सकाळी ८ ची आरती झाल्यानंतर प्रत्येक सेवेकर्‍याने १ माळ गायत्री मंत्र व ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जपावे. ठिक १०:३० अन्नाचे ५ नैवेद्य करावे. प्रथम कुलदेवता, दुसरा नारायणाचा या क्रमाने ५ वा गायत्री मातोश्रींचा असे नैवेद्य मांडावे. सकाळच्या तीन व सायंकाळच्या दोन अशा आरत्या म्हणून सर्वांना प्रसाद द्यावा. गायत्री मातेसाठी शुध्द तूप, गुळाचा, गव्हाच्या पिठाचा प्रसाद करावा.

(अधिक माहिती ज्ञानदान भाग १ बघावा.)

सेवा : गायत्री सहस्त्रनाम, गायत्री जप यांचे वाचन, पठन, हवन करावे.

अग्रयण :- नव्या तांदूळाचा हो करून मगच नवे तांदूळ खाण्यासुरूवात करतात. म्हणून याला ‘नव्याची पौर्णिा’ म्हणतात. पहिल्या अपत्यास या दिवशी सायंकाळी ओवाळावे.

* खंडेनवमी : सर्व यंत्र, मशिनरी व वाहनांचे पूजन करावे.