चला, संकल्प करूया..प्रजासत्ताक दिन मुलांसोबत साजरा करूया

जर आजच्या लहान पिढीचे भविष्यात कर्त्यवदक्ष, राष्ट्राभिमानी,सुजाण नागरिकांमध्ये रूपांतर करावयाचे असेल तर याची प्राथमिक जबादारी पालकांची आहे. कारण आपली मुले ही त्यांच्या पालकांच्या अनुकरणाने संस्कारित होत असतात.

येत्या 26 जानेवारीला भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. या दिवशी विद्यार्थी, शाळा, कॉलेज मध्ये जाऊन ध्वजवंदन करीत असतात पण पालकांचा या राष्टीय सणामध्ये सहभाग असतो का?

पालकांनी यावर्षीपासून प्रजासत्ताक दिनाला मुलांबरोबर स्वतः शाळेत जाऊन त्यांच्या बरोबर ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी व्हावे, आपल्या वागणुकीतून मुलांमध्ये राष्ट्रीय सणांचे महत्व, देशभक्तीची भावना नक्की रुजेल.

परमपुज्य गुरुमाऊली म्हणतात देशासाठी आपण जर काही करू शकणार नाही तर मग या देशात आपण जन्म तरी का घेतला हा प्रश्न निर्माण होतो…….

आपण तमाम सेवेकरी परमपुज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा रुजू करतो. पण मुळात या सर्व सेवांमागील परमपुज्य गुरुमाऊलींचा संकल्प सेवेकऱ्यांनी केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता या देशाचे संस्कारी, सदाचारी, स्वावलंबी आणि राष्ट्राभिमानी असे नागरिक स्वतः व्हावे व इतरांना घडवावे आणि त्यातून राष्ट्र समृद्ध व्हावे” हा असतो.

तमाम बालसंस्कार प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी व पालकांनी राष्ट्राभिमान जागृत करणाऱ्या या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे व प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करावा ही नम्र विनंती…

माझा देश….माझे कर्तव्य….माझा प्रजासत्ताक दिन..

🇮🇳जय हिंद..जय भारत.🇮🇳