विश्वविक्रमी मराठवाडा युवा महोत्सव २०१९ – वेरुळ (औरंगाबाद)

दिनांक 18 ऑगस्ट रोजी वेरूळ येथे युवा महोत्सव व विश्वविक्रमी मानवी साखळी द्वारे देणार व्यसनमुक्तीचा संदेश

                 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक  सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्यावतीने मराठवाडा स्तरीय  युवा महोत्सव व व्यसनमुक्तीचा संदेश देणारी विश्वविक्रमी मानवी साखळी उभारण्याचे आयोजन करण्यात आले आहे.दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ सेवा कार्य हे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून विविध समाज उपयोगी 18 विभागांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. या संस्थेच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग हा  विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या सर्वांगीण समस्यांवर  प्रबोधन करीत असतो.

या विभागाच्या माध्यमातून समाजासाठी आज्ञाधारी, निर्व्यसनी व कर्तव्यदक्ष युवक पिढी निर्माण करण्यासाठी या विभागाचे मार्गदर्शक श्री नितिन भाऊ मोरे यांचे युवकांसाठी प्रबोधनपर हितगुज आयोजित केलेले आहे.

दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी श्री घृष्णेश्वर जोतिर्लिंग परिसरातील श्री संत जनार्दन स्वामी हॉल मध्ये सकाळी 9 ते 1 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मानवी साखळी उभारण्याचे विश्वविक्रमी ध्येय या विभागाने ठेवले आहे आणि या मानवी साखळीत सहभागी होणारे सर्व विद्यार्थी, युवक, सेवेकरी समजास व्यसनमुक्तीचा संदेश देणार आहेत.

व्यसनाधीनता या गंभीर समस्येवर सेवा कार्याद्वारे करण्यात येणारे प्रबोधन व उपाय याची देखील माहिती देण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन होणार आहे. या अभूतपूर्व विश्वविक्रमी मानवी साखळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सेवा कार्याच्या युवा प्रबोधन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.