परमपूज्य गुरुमाऊलींना ”भारत सेवा रत्न” व ”विजय रत्न गोल्ड मेडल ” पुरस्कार प्राप्त…

                 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे पीठाधीश व आपल्या सर्वांच्या हृदयात गुरुतत्वाची ज्योत सतत तेवत ठेवणारे, प्रात:स्मरणीय श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या बालसंस्कार उपक्रमाची दखल घेत, International Institute of Education & Management या आंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींना ”भारत सेवा रत्न” हा पुरस्कार व ”विजय रत्न गोल्ड मेडल अवार्ड” ने आज दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी आदरपूर्वक सम्मानित केले. आदरणीय नितीनभाऊंनी हा पुरस्कार दिल्ली येथे संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमात मेजर जनरल टी. एस. राव सर, सी.बी.आय. चे निवृत्त डायरेक्टर डाॅ. व्ही. एन. सेहगलजी यांच्या हस्ते स्वीकारला