श्री दत्त जयंती सप्ताह (मार्गशीर्ष शु. ९ ते मार्गशीर्ष शु.१५ ) दि. ५ डिसेंबर २०१९ ते १२ डिसेंबर २०१९

या दिवशी सर्वत्र दत्तजयंती उत्सव केला जातो. श्री दत्त महाराज हेच आपल्या मार्गाचे मूळ असल्याने हा कार्यक्रम सामुदायिकपणे व खूप भक्तिभावाने करावयाचा असतो. श्रीदत्तजयंती-निमित्त सर्व सेवेकर्‍यांनी उपोषण करावयाचे असते व उपवास, दुसर्‍या दिवशी प्रतिपदेला १०.३० च्या आरतीनंतर सोडावयाचा हे प्रथम लक्षात ठेवावे.

या दिवशी केंद्रात नैवेद्य आरती १०.३० वाजता न करता १२.३९ नंतर करतात. साधारण सर्व फोटोंची पूजा करून, हार घालून ठिक १२.१५ वाजेपर्यंत गुरुचरित्रातील ४ था अध्याय एका सेवेकर्‍याने सावकाश वाचावा व इतरांनी श्रवण करावा. बरोबर १२.३९ ला अध्यायातील वाचनातील (त्यातील “तीन बाळे झाली”, या ओळीनंतर वाचन बंद करावे).

त्यावेळी अवधूत चिंतन ‘श्री गुरुदेव दत्त’ असा तीनवेळा मोठ्याने जयजयकार करून आरती करावी. या दिवशी नैवेद्यात अन्नाचा नैवेद्य न करता फराळाचा उपवासाचा नैवेद्य करावा. सकाळच्या ३  व सायंकाळच्या २  आरत्या कराव्यात. दुसर्‍या दिवशी सकाळची ८ ची आरती झाल्यानंतर १०.३० पूर्वी श्रीसत्यदत्तपूजा करून सर्वांनी ११ माळ जप करावा. अन्नाचे ६ नैवेद्य दाखवून १०.३० ची आरती करून प्रसाद वाटावा.

सप्ताह कालावधीतील रोजचा दिनक्रम

* सकाळी ७.३० वा. :-  औदुंबर प्रदक्षिणा

* सकाळी ०८.०० वा. :- भूपाळी आरती

* सकाळी ०८.३० ते १०.३० वा. :-  माईकवरून सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन, त्याचवेळी यज्ञमंडपात प्रातिनिधीक स्वरूपात सेवेकर्‍याकडून नित्यस्वाहाकार

* सकाळी १०.३० वा. :-  नैवेद्य आरती (सकाळच्या तीन आरत्या, मंत्रपुष्पांजली व प्रार्थना)

* सकाळी १०.३० ते १२.३०:- विशेषयाग

* दुपारी १२.३० ते २.०० वा. :-  भोजन आणि विश्रांती
* दुपारी २.०० ते ६.०० वा. :-  श्री स्वामी चरित्र सारामृत व श्री दुर्गा सप्तशती (प्राकृत) वाचन,१ आवर्तन रुद्राध्याय, ग्रामअभियान अंतर्गत १८ विभागाचे मार्गदर्शन व सांस्कृतीक कार्यक्रम

* संध्या ६.०० ते ६.३०वा.:-  औदुंबर प्रदक्षिणा
* संध्या ६.३० वा.:-  नैवेद्य आरती (संध्याकाळच्या सर्व आरत्या मंत्रपुष्पांजलीसह)
* संध्या ६.५० वा.:-  नित्यध्यान, गीतेचा १५ वा अध्याय श्री विष्णूसहस्त्रनाम वाचन, श्री स्वामी समर्थ मंत्र जप एक माळ, त्यानंतर ऐच्छिक श्री स्वामीचरित्र किंवा श्री दुर्गासप्तशती सामुदायिक वाचन करावे.
* महत्वाची सूचना *
श्री गुरुचरित्र पारायण करू इच्छिणार्‍या सेवेकर्‍यांनी सप्ताहापूर्वी १५ दिवस अगोदर आपली नाव नोंदणी सेवाकेंद्रात करावी जेणेकरून नियोजन करणे सोपे जाईल, तसेच ऐनवेळी नाव नोंदणी करून होणारी गैरसोय टाळता येईल.