प्रदूषणमुक्त-फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावलीचा संदेश देणारे चिमुकल्यांनी बनविले विश्वविक्रमी ५१००० कागदी आकाशकंदील! Wonder Book of World Records International मध्ये नोंद होणार
दिनांक १.१०.२०१९ नागपूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाअंतर्गत एकाच दिवशी एकाच वेळी एकावन्न हजार शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या प्रदूषणमुक्त- फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावलीचा संदेश देणारे विश्वविक्रमी ५१००० कागदी आकाश कंदील बनविले.
हा उपक्रम या सेवाकार्याचे प्रमुख मार्गदर्शक परमपूज्य गुरूमाऊली व बालसंस्कार तथा युवा प्रबोधन विभागाचे मार्गदर्शक आदरणीय श्री नितीनभाऊंच्या मार्गदर्शनाने राबवण्यात आला होता.
या उपक्रमात नागपूरमधील श्री स्वामी सेवा केंद्रातील आणि काही शाळांमधील असे एकावन्न हजार विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित जमले आणि आणि एकाच दिवशी एकाच वेळी ५१००० विश्वविक्रमी आकाश कंदील तयार करून प्रदूषणमुक्त फटाकेमुक्त- प्लास्टिकमुक्त दीपावलीसाठी एकप्रकारे भविष्यातील चळवळ उभी केली.
या उपक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे विद्यार्थींनी स्वतः तयार केलेल्या या आकाशकंदीलावर प्रदूषणमुक्त – फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावलीचे संदेश लिहिण्यात आलेले आहेत. यंदाच्या दिपावलीत हे आकाशकंदील घरोघरी झळकणार असून त्यातून प्रदूषणमुक्त- फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावलीसाठी आग्रह करण्यात आला आहे
परिणामी प्रदूषणमुक्त- प्लास्टिकमुक्त भारत या संकल्पनेत या उपक्रमाचा महत्वाचा हातभार लागणार आहे
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देखील स्वनिर्मितीचादेखील आनंद मिळून ते पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अधिक सजग होतील असा कार्याच्या वतीने विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भविष्यात प्रदूषणमुक्त- फटाकेमुक्त- प्लॅस्टिकमुक्त दीपावली साजरा करण्याची सामूहिकरीत्या प्रतिज्ञा केली तसेच या अभियानास व्यापक स्वरूप देण्यासाठी भविष्यात देखील वेगवेगळ्या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार आणि विश्वास बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.