मासिक सत्संग महासभा येथे परमपूज्य गुरुमाऊली यांचे हितगुज व सर्व सेवेकरी / भाविक / विभाग प्रतिनिधींसाठी बालसंस्कार व युवा प्रबोधन, विवाह संस्कार, कृषीशास्त्र, पशुगौवंश, स्वयंरोजगार, याज्ञिकी इत्यादी विभागातील प्रशिक्षणाचा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रशिक्षण लाभ घ्यावा.
दर महिन्याच्या मासिक मिटिंगला हजर राहून इच्छुक विभागात नोंद करा.
अधिक माहितीसाठी संबंधित विभाग प्रतिनिधी संपर्क:
विवाह नोंदणी : संपर्क (७७५५९४१७१०)
स्वयंरोजगार विभाग : संपर्क (७७५५९४१७५३)
माहिती व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत (सेवेकरी ओळखपत्र व SMS सेवा) : संपर्क (७७५५९४१७१५ / ९९२२४२००१०)
कृषीशास्त्र विभाग : संपर्क (७७५७००८६५२)
बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग ः (७७२००१००७४)
देश विदेश स्वामी सेवा अभियान विभाग ः (७७२००१००७३)
प्रशिक्षण स्थळ: अन्नछत्र बिल्डींग हॉल क्रमांक १,२,३
संपर्क: (७७५७००८६५२ / ७७५५९४१७१०)
श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर : (०२५९४ – २३३१७० / २०४२५२)
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : (०२५५७-२२१७१०)
मागील मासिक सत्संग महासभा वृतांत : दि.२४ ऑगस्ट २०१९
श्री गुरुपीठ : क्षेत्र त्र्यंबकेश्वर
स्वामींचे सेवेकरी हे ‘सेनापती’ आहेत….!
– परमपूज्य गुरुमाऊली
प्रकाशन व लोकार्पित साहित्य : श्री स्वामी समर्थ सेवा अंक- सप्टेंबर, दिपावली संच, श्रीनिवास उटणे, विजयप्राप्ती तोडगा.
परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजातील अमृतकण :
* आज गोकुळाष्टमीच्या निमित्त्याने देशभरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो, हा उत्सव अतिशय सात्विक व अल्पखर्चाने होणे अपेक्षित असते. या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांचा जीवनादर्श सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे.
* पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की, कुठलेही संकट येता समर्थांचे सेवेकरी मागे राहत नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर विभागातील बर्याचशा सेवेकर्यांच्या घरात कंबरेपर्यंत पाणी होते. तरीही त्याची पर्वा न करता इतर आर्तपिडीत वयोवृध्दांसाठी सेवेकरी परिवाराने मदतीचा हात पोहोचवला यालाच ‘माणूसकीची संस्कृती’ असे म्हणतात.
* सुमारे दोन ट्रक पाण्याच्या बाटल्या, जीवनावश्यक वस्तू, संसारोपयोगी वस्तू तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य इ. सामुग्री पूरग्रस्तांसाठी पोहोचविण्यात आली आहे. मदतीचा हा ओघ अजूनही सुरुच राहील. सेवेकर्यांच्या या कार्याला कुठल्याही प्रसिध्दीची गरज नाही कारण माणूसकी नावाचे शास्त्र अवलंबण्यास कुठल्याही वृत्तपत्र, बातम्या व प्रसिध्दी माध्यमाची कधीच गरज नसते.
* आगामी श्रीक्षेत्र बासर येथे होणार्या मेळाव्यास सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सरस्वती मातेचा व भारतमातेचा आशीर्वाद प्राप्त करुन घ्यावा.
* जगातले सर्व लोक सेवेकर्यांची वाट बघत आहे कारण समर्थ सेवामार्गात मानवाच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर उपचार आहेत आणि ते उपचार सर्वदूर प्रसारीत करण्याची मानसिकता सेवेकर्यांची आहे.
* प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ‘माझा देश ग्रामीण भागात आहे.’ गावा-गावातील कुटुंबांपर्यंत ग्रामविकासाच्या माध्यमातून सेवेकर्यांनी पोहोचले पाहिजे.
* मुल्यसंस्कार या विभागातून राष्ट्रभक्ती राष्ट्रसेवा हा संस्कार नव्या पिढीकडे पोहोचविला जात आहे. आपले वार्धक्य सुरळीत जावे यासाठी वर्तमान व भावी पिढ्यांना बालसंस्कार वर्गात पाठविण्याची जबाबदारी पालकांचीच आहे. वार्धक्याची चिंता संस्काराशिवाय मिटत नाही. कारण ‘संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल व धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल.’.
* प्रश्नोत्तरे करणार्या सेवेकर्यांची आज विश्वाला गरज आहे. दिव्याने दिवा, ज्योतीने ज्योत लावल्यासच हे मोठे कार्य पार पडेल.
* भारतीय संस्कृती ही चार खांबांवर उभी आहे त्यातील विवाह हा संस्कार प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सेवामार्गातील विवाहांना स्वामींचा आशीर्वाद असतो. बिनाहुंडा, सोनं-नाणं न घेता अल्पखर्चात अर्थात साखरपुड्यात विवाह केल्यास अनावश्यक खर्च तर टळेलच शिवाय सर्व अनर्थही टळतील.
* कृषीतंत्र अवगत करण्यासाठी जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. भारतात जे कृषी ज्ञान अवगत आहे ते जगात कुठेही नाही. शेतीशास्त्राचे पुनर्जीवन गरजेचे आहे.
* भारतातील सर्व नद्या ह्या देवता आहेत मात्र आज त्याचे रुपांतर गटारींमध्ये होत आहे. कचरा, प्लास्टिक, मलमुत्र अशा प्रकारची घाण नद्यांमध्ये सोडली जाते. या कृतीतून मानवाची राक्षसीवृत्तीच दिसून येते. निसर्गाचा समतोल बिघडविण्यास मानवच सर्वार्थाने जबाबदार आहे.
* सेवेकरी हा सेवामार्गाची ओळख आहे. त्यांनी मागे राहून चालणार नाही. हाती येईल ते काम करण्याची तयारी सेवेकर्यांची असावी.
* स्वयंपाक घरातील मसाल्याचा डबा हा आरोग्याचा खजिना असतो. हळद, जिरे, दालचिनी, लवंग, काळी मिरी, धने, तेजपान अशा साहित्याचा वापर माता-भगिनींनी अवश्य करावा. नव्या पिढीने आजीबाईच्या बटव्याकडे वळले पाहिजे.
* दालचिनी, मध व गरम पाणी एकत्र करुन पिल्यास वजन कमी करण्यास उपयुक्त ठरेल..
* विड्याचे पान व 1 ग्रॅम जिरे अनाशेपोटी घेतल्यास प्लेटलेट्स नियंत्रणात राहतात. हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
* सामाजिक बांधिलकी, सामुदायिक उपक्रम ह्यातूनच 80% समाजकार्य व 20% अध्यात्म साध्य होईल.
* माता-भगिनींनी कधीही केस मोकळे सोडू नयेत. दैवी अथवा अज्ञात शक्तींचे संचार केस मोकळे सोडल्यामुळे होत असतात. संचार आलेल्या स्त्रियांचे केस बांधल्यास संचार निघून जातो. कारण डोक्यावरचे केस हे एरियल असतात. संचार येणे, असंभव बाबी बोलणे या कृती मोकळ्या केसांमुळे होत असतात.
* मानवकल्याण, जनकल्याण, राष्ट्रकल्याण ह्या सेवामार्गाच्या प्रमुख संकल्पना असून स्वामी कार्य बहुविध अंगांनी बहुविध भाषेतून सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे.
* सामान्य माणसाची भूमिका घेऊन असामान्य कार्य करणार्यांना सेवेकरी असे म्हणतात.
* निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ही घोषणा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. ही सर्व संत मंडळी भिन्न-भिन्न संप्रदायाची होती. राष्ट्रोत्कर्षासाठी या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. वेगवेगळ्या सांप्रदायिकतेचा झेंडा हाती घेऊन कार्य करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन कार्य केल्यास कार्याची शक्ती वाढते.
* हरवलेली व्यक्ती घरी येण्यासाठी- ‘कार्तविर्यार्जुन मंत्र‘ २२ वेळा म्हणून कालभैरवास हार, नारळ ठेवून सन्मान विनंती करावी.
* देश-विदेश विभागांर्तगत परमपुज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत ‘दुबई’ येथे दि.२२ डिसेंबर २०१९ आंतरराष्ट्रीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.