विश्‍वविक्रमी किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सव – पुणे

पश्‍चिम महाराष्ट्र – विश्वविक्रमी किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सव – पुणे

विश्वविक्रमी किल्ले बनवा व राज्यस्तरीय युवा महोत्सव

 

दिनांक : ५ जानेवारी २०२० , वेळः सकाळी ९ वाजता, स्थळः अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारी, भोसरी गावजत्रा मैदान, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे

 

विद्यार्थी उभारणार मातीच्या गडकिल्ल्यांच्या ५०० प्रतिकृती,

विश्वविक्रमी उपक्रमातून दिला जाणार गड-किल्ले संवर्धनाचा संदेश.

 

 

  • अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, सेवा कार्याच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून विश्वविक्रमी ‘किल्ले बनवा’ व राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्याच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात ज्यामध्ये मुलांमध्ये-युवांमध्ये असणारी व्यसनाधीनता – अंधश्रद्धा समुळ नष्ट करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व खऱ्या अध्यात्माची परिभाषा रुजवली जाते तसेच पर्यावरण रक्षण व सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूक करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न केले जातात.
  • परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशिर्वादाने व आदरणीय श्री नितिनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने बालसंस्कार युवा प्रबोधन विभाग आयोजित या वर्षीचा पहिला उपक्रम म्हणजेच विश्वविक्रमीकिल्ले बनवा  राज्यस्तरीययुवा महोत्सवहोय. हा विश्वविक्रमीकिल्ले बनवाव राज्यस्तरीययुवा महोत्सवदिनांक ५/१/२०२० रोजी सकाळी ९ ते  या वेळेत अंकुशराव लांडगे नाटयगृह शेजारी, भोसरी गावजञा मैदान, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे आयोजित केला आहे.
  • या नियोजित उपक्रमातून सेवा केंद्रातील बालसंस्कार वर्गाच्या सर्व शाखा व काही शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून एकाच दिवशीएकाच वेळी तब्बल ५०० मातीचे गडकिल्ले बनवून घेऊन त्याद्वारे छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची इतिहासाची माहिती जागतिक स्तरावर पोहचवण्याचा प्रयत्न आहे.
  • या उपक्रमात जे मातीचे गडकिल्ले उभारले जाणार आहेत त्या किल्ल्याची भौगोलिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शवणारे पोस्टर त्या ठिकाणी असणार आहेत. विद्यार्थी मातीचे गडकिल्ले साकारताना त्या किल्ल्यांचे प्रकार, वैशिष्ट्य व वेगळेपण, तसेच गडकिल्ल्यांवर असणारे विविध असणारे अवशेष, त्यांचे अर्थ याबाबत सर्व माहिती देणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातून उभारले जाणारे हे गडकिल्ले म्हणजे एकप्रकारे इतिहासाचा जागर करणारे आहेत.
  • विद्यार्थी व युवांमध्ये छत्रपती शिवरायांचे विचार रुजविणे तसेच उपक्रमांतून गड-किल्ल्यांच्या संरक्षण-संवर्धनाचे अभियान अधिक बळकट करणे असा उद्देश या राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजनाचा आहे. या राज्यस्तरीय युवा महोत्सवात बालसंस्कार विभागप्रमुख श्री नितिन भाऊ मोरे यांचे युवक व युवतींसाठी प्रेरणादायी व प्रबोधनपर मार्गदर्शन आयोजित केलेले आहे. या आगामी विश्वविक्रमीकिल्ले बनवाव राज्यस्तरीययुवा महोत्सवातजास्तीत जास्त विद्यार्थी, युवकयुवतींनी सहभागी होण्याचे आवाहन बालसंस्कार युवा प्रबोधन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.