गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर

gurupeethगुरूप्रणालीचा विचार करता आपणास लक्षात येते की, श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच दत्त महाराजांचे कार्य दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आजही सुरु आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लोंग श्री त्र्यंबकेश्वर (भगवान शिव, भगवान बश्च्स्नदेव आणि भगवान विष्।णू हे पार्वती मातोश्रींसहित स्थापित आहेत म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे स्थान) कुशावर्त तीर्थ, ब्रम्हगिरी पर्वत, गंगामातेचे उगमस्थान, गौतम ऋषींची शेती संशोद्यन भूमी, निवृत्तीनाथांची समाधी, पिधले महाराजांची तपोभूमी अशा या पावनभूमीचे सौंदर्य वाढविणारे श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठ- त्र्यंबकेश्वर गावाच्या पूर्वेला ब्रम्हगिरीच्या उतारावरती सुमारे २१ एकर जागेत प्राचीन वटवृक्षाच्या सानिध्यात साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजंचा आशिर्वाद घेण्यासाधी येत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान हे मूळ दरबारात मध्यभागी आहे. याधिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज मयूरासनावर बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल इतकी सुंदर मूर्ती आहे. आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बवसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभव आपल्यास प्रत्ययास येईल. श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठात वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री औदुंबर सद्गुरू प.पु. पिठले महाराजांचे स्मृतीस्थान, तेजोनिद्यी सद्गुरू प.पू. मोरेदादांचे स्मृतीस्थान, यज्ञभूमी, प्रसादालय आहेत. गुरूकुलपीठाची वैशिष्ठैः

श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान

श्री गुरुपीथातील मुख्य स्थान हे मुळ दरबारातील मध्य भागी आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होइल इतकी सुन्दर मूर्ति आहे. आपण थोडा वेळ मूर्ति समोर बसून ध्यान केले तर जीवनातली अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रत्येयास येइल.

परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार

हजारों सेवेकारी एकाच वेळी समुदायिक सेवेत सहभागी होवू शकतील असा भव्य( सभा मंडपासह) दरबार असून या दरबारात प्रवेश करताच एक आगळी वेगळी अनुभूती भाविकांना मिळते. हा दरबार म्हणजे वास्तुशास्त्राचा आगळ वेगळ प्रतिक आहे. येथे स्थापित केलेल्या यंत्रानद्वारे आध्यात्मिक उर्जेची निर्मिती होत असल्याने चैतन्य पूर्ण आध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे.

तेजोनिधी सदगुरू प. पू. मोरेदादांचे स्मृति स्थान:

दरबाराच्या इशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे. सदगुरू प. पू. पिठले महाराजांनी केलेल्या तेजाच्या उपासनेतून ते तेज सदगुरू प. पू. मोरेदादांना मिळाले म्हणून त्यांना ‘तेजोनिधी’ असे म्हणतात. सदगुरू प. पू. मोरेदादांनी जनामानासाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडविले

सदगुरू प. पू. पिठले महाराजांचे स्मृति स्थान:

हे प्रधान दारातून प्रवेश केल्यानंतर प्रथम डाव्या बाजुला म्हणजेच मंदिराच्या आग्नेय कोपरयाकड़े आहे.तेथे आपल्याला सदगुरू प. पू. पिठले महाराजांच्या चरण पदुकांचे दर्शन होइल. सदगुरू प. पू. पिठले महाराजांनीच ह्या आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची स्थापना केली आहे

वेद अध्ययन, यज्ञभूमि

यज्ञभूमि यज्ञ, यागाविषयी समाजात असलेली निरर्थक भिती दूर करून यज्ञ, कर्म कान्डाची शास्रशुद्ध माहिती सोप्या भाषेत देण्यासाठी तसेच सर्वसामान्य सेवेकर्यांनी सत्यनारायण ते वास्तुशांती हे यज्ञविधी स्वतः कसे करावे हे प्रशिक्षण देण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. श्री गुरु पीठात भव्य यज्ञ शाळा कार्यरत आहे.
वेद अध्ययन: वेद, पुराण व अत्यंत दुर्मिळ अशा विविध ग्रंथांचा संग्रह ह्या विभागात उपलब्ध आहे.

वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज

श्री स्वामी चरित्र सारामृतात वर्णन केल्याप्रमाणे भागवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदा तट यात्रेची सुरवात त्र्यम्बकेश्वर येथून केली. त्यावेळी त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षा खाली असावे, याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे. या वट वृक्षा खाली छोटेसे मंदिर आहे, अतिशय सुन्दर अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून या वटवृक्षाला अकरा प्रदक्षिणा कराव्यात. प्रत्येक प्रदक्षीणेला वटवृक्षाच्या पारंब्याना स्पर्श करून ती आपल्या कपाळला टेकावी. त्यास साक्षात् श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण स्पर्शाची अनुभूती येइल. परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे ” माझे गांव दत्त नगर, वटवृक्ष, मूळ मूळ मीच मूळ स्वरूपात या वट वृक्षाच्या रुपात उभा आहे.

मुद्रणालय

या विभागात सेवा मार्गाचे सर्व साहित्य, संशोधन, ग्रंथ निर्मिती, ग्रंथ छपाई व वितरण व्यवस्था केली जाते. दरमहा प्रकाशित होणारे स्वामी सेवा मासिक अंक, दिनदर्शिका तसेच सर्व विभागांसाठी मार्गदर्शक ग्रंथ संशोधित व प्रकाशित केले जातात. आयुर्वेद विभाग आयुर्वेदास पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी वनस्पती लागवड, पंचकर्म, औषध निर्मिती, आयुर्वेद संशोधन असे प्रयत्न हा विभाग करत आहे. तसेच अद्ययावत आयुर्वेद प्रयोगशाळा कार्यरत आहे.

अन्नछ्त्र विभाग(नविन इमारत)

श्री गुरुपीठाच्या अन्नछ्त्र या मह्त्वपूर्ण विभागाचे व्याप्त व सुसज्ज स्वरुप आकार घेत आहे. अन्नछ्त्र या विभागाची सुसज्ज, आधुनिकतेने परिपूर्ण अशी इमारत असेल. त्याचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर बिल्ट अप अरीया असलेली, तळ मजला + २ मजले बांधकाम असलेली इमारत असेल. अद्ययावत, सुसज्ज किचन, तसेच कोल्ड स्टोअरेज असेल सौरऊर्जेवर अन्नाची निर्मिती करण्यात येईल. जेणे करून इंधनाची बचत होईल. अन्नधान्य साठविण्यासाठी वैज्ञानिक पध्द्तीने निर्जतुकीरण असलेले साठवण केंद्र (गोडावून) असेल. तयार झालेले अन्न दुसर्‍या मजल्यावर नेण्यासाठी विद्युत पाळणा(लिफ्ट)असेल. पहिल्या मजल्यावर एक भव्य हॉल असेल. त्या हॉल मध्ये एकाचवेळी १ हजार लोक बसून भोजनाचा आनंद घेऊ शकतील. दुसर्‍या मजल्यावर दोन हजार भाविक सेवेकरी भोजन-महाप्रसाद घेऊ शकतील आणि या सर्वांची आसन व्यवस्था स्वतंत्र असेल. स्त्री आणि पुरूष वेगवेगळे बसू शकतील. आणि अशा भव्य अन्न छत्रामध्ये भरपूर हवा आणि प्रकाश असेल. अत्त्याधुनिक तंत्राने युक्त अशी अन्नछत्र इमारत असेल. जर आपल्याला अन्नछत्रा साठी देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुकुल पीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात तसेच खालील A/C. मध्ये आपली देणगी बँकेत जमा करू शकतात, सदर देणगी आयकर माफ असेल. जर आपण बँकेत जरी A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच पावती मिळेल.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक A/C number : ५२८७२१६०००००१३ सिंडीकेट बँक, शाखा: त्र्यंबकेश्वर अधिक माहितीसाठी nitin@ma.dindoripranit.org या इमेल वर संपर्क साधा.

गोशाळा:

हिंदू धर्मात गायीचे महत्त्व सर्वज्ञात आहे. या विभाग गायींचे पालन पोषण करून औषध निर्मितीसाठी गोमुत्राचा पुरवठा करतो.

शेती संशोधन:

प. पु. गुरुमाऊली शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन करतात. आतापर्यंत शेकडो मेळावे त्यांनी यासाठी घेतले. हा विभाग अध्यात्मिक व आधुनिक शेती यावर प्रायोगिक संशोधन करून, ग्रंथ निर्मिती करून ते ज्ञान शेतकर्याँपर्यंत पोहचवितो.

बाल संस्कार विभाग:

देशभर सेवा मर्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या बाल संस्कार कार्यासाठी आवश्यक असलेले सेवेकारी तयार करण्याचे व सुट्ट्या असलेल्या वेळी बाल संस्कार शिबिर घेण्याचे काम हां विभाग करत असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे.

वास्तु, ज्योतिष शास्त्र विभाग:

समाजातील वास्तुशास्त्र विषयक निराधार भीती घालवून वास्तु विषयक शास्त्र शुद्ध मार्गदर्शन करून सर्वांची वास्तु दोषातुन मुक्ती करणे, ज्योतिष, हस्त, अंक, शिवस्वरोदय व तत्सम शास्त्र समाजात रुजविण्यासाठी हां विभाग काम करतो. विभागांच्या प्रशिक्षण शिबिरांसाठी स्वतंत्र व्यवस्था येथे आहे.