ज्ञानभांडार

  • हस्तशास्त्र
  •  संख्याशास्त्र
  •  शिवस्वरोदय शास्त्र
  •  वाढदिवस कसा साजरा करावा 

हस्तशास्त्र हे प्राचीन शास्त्र असून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग श्रीक्षेत्र दिंडोरी येथे इतर विविध विषयांबरोबर हस्तशास्त्राचा अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तिच्या हातावर विविध रेषा, चक्र, तीळचिन्ह, मस चिन्ह, विविध ठिकाणी असते. हस्तशास्त्राचा अभ्यास करतांना आपणास दिंडोरी दरबार येथे प्रकाशीत झालेले व प्रत्येक नजिकच्या दिंडोरी प्रणित सेवाकेंद्रात उपलब्ध असणारे ज्ञानदान भाग-४ ग्रंथांमध्ये हस्तशास्त्रासंबंधी माहिती देण्यात आली आहे. हस्तशास्त्राच्या सहाय्याने व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात उदा. जर एखाा व्यक्तीच्या हातावर डॉक्टर किंवा ईजिनिअरचे योग असल्यास त्याला त्या क्षेत्रात जावून अभ्यास करता येतो.तसेच विविध प्रसंगावर अधयात्मिक सेवेने मातसुद्धा करता येते. सर्वत्र प्रारब्ध अटळ असते असे नाही. काही उपासना मार्गाने टळू शकते. काही भागाची तीव्रता कमी होते. अटळ प्रारब्ध अत्यल्प राहते. कारण शेवटी सुख दुःखाचे परिणाम हे मनाची आध्यात्मिक अवस्थाच असते. व हस्तरेषा शास्त्र हे मनाच्या स्थितीचा आरसाच आहे. मनावरील कायम बदल रेषेवरून जाणता येतात.
१) मुख्यरेषा
२) हाताची नखे
३) बोटे
४) विविध प्रकारच्या रेषा
५) काही महत्त्वाचे योग
हस्तशास्त्राबाबत अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग ४ व पंचामृत या ग्रंथाचा अभ्यास करावा.हे ग्रंथ नजिकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे उपलब्ध आहेत.
संपर्क: ०२५५७-२२१७१०

संख्याशास्त्रालाच अंकशास्त्र असेही म्हणतात. संख्याशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच मानवी जीवनाच्या भूत, भविष्य, वर्तमान याचा शोध घेणारे एक विश्वसनीय शास्त्र आहे. कुंडलीशास्त्राप्रमाणेच शुन्यातुन निघून पुन्हा शुन्यात विलिन होणार्‍या या विश्वाच्या वर्तुळाचे बारा भाग करून हे संख्याशास्त्र तयार झाले आहे. या शास्त्रामध्ये जन्मतारखेची संपूर्ण बेरीज करून त्यावरून व्यक्तीचा भाग्यांक व मुल्यांक काढून त्यावरून त्या व्यक्तीचे मित्र क्रमांक, शत्रु क्रमांक, शुभवार, भाग्य महिना, भाग्यरत्न संबंधित राशी, व्यक्तीचा स्वभाव, संभाव्य आजार, इ.माहिती मिळते. संख्याशास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमहत्त्व, गुण-दोष, मर्यादा, जीवनातील धोके, जीवनातील प्रगतीचे मार्ग इ.ची ओळख होते. व त्या अनुषंगाने योग्य ती सावधानता राखून स्वभाव बदलण्याचे प्रयत्न होवू शकतात. ईश्वरी सेवेमुळे त्यावर मात करता येवू शकते.भाग्यांक व मुल्यांक काढण्याची पद्धत :- भाग्यांक व मुल्यांक काढताना संबंधित व्यक्तींची खरी जन्मतारीख घेऊन तिची पुढील प्रमाणे बेरीज करतात. उदा. समजा व्यक्तीचा जन्म हा ०६/०४/१९३५ आहे तर प्रथम त्या जन्म दिनांकाची एकांक बेरीज करावी. ६+४ १ ९ ३ ५ =२८ परत २ ८ =१० परत १ ०= १ ह्या ठिकाणी व्यक्तीचा जन्म दिनांक म्हणजे ०६ ह्याला मुल्यांक व संपूर्ण बेरजेच्या एकांकाला म्हणजे १ ह्या अंकाला भाग्यांक म्हणतात. १ ते ९ भाग्यांक विषयीक विशेष माहिती देणारा ग्रंथ ज्ञानदान भाग १ व ४ या ग्रंथ.
संपर्क: ०२५५७-२२१७१०
 
आपले पुर्वजऋषिमुनी यांनी या स्वरशास्त्राचा खूपच बारकाईने अभ्यास केला आणि त्याचा उपयोग योगशास्त्राला करून देतांना प्रापंचिक व पारमार्थिक कार्यासाधी कसा उपयोग करावा याचाही खुलासा केला आहे. स्वर शास्त्रांची प्रशंसा करतांना ते म्हणतात –
स्वर हीनश्च दैवज्ञो नाथहीनं यथा गृहम । शास्त्रहीनं यथा वस्त्रं शिरोहीनं च यद्वपुः ।
गृहस्वामी वाचून जसे गृह, शास्त्राचा अएयास न करता वक्तृत्व, मस्तकावाचून जसे द्यड, तसे स्वरज्ञाना शिवाय ज्योतिषाला पूर्णत्व येत नाही.या शास्त्राचा उपयोग कुणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाधी किंवा स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडविण्यासाधी केला जातो. या शास्त्रात कुयोग मुळीच नाहीत.श्वास बाहेर पडतांना ‘हं’ व आंत जातांना ‘सः’असा ध्वनी ऐवूत् येतो. याचा ङ्गहंसद्म असा शब्द तयार होतो व त्यावर लक्ष वेंत्द्रित केले तर ॐ काराचा ध्वनी ऐवूत् येतो. नाकपुडीतून जो श्वासोच्छवास होतो त्यालाच स्वर असे म्हणतात. डाव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर वहातो तेव्हा त्याला चंद्र स्वर किंवा इडा म्हणतात. उजव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर तेव्हा त्याला सुर्य स्वर किंवा पिंगला नाडी म्हणतात. दोन्ही नाकपुड्यातून जेव्हा स्वर वाहतो तेव्हा त्याला सुषुम्ना असे म्हणतात.ज्या बाजूचा स्वर वहात असेल ते पूर्णांग असते.ज्या बाजूचा स्वर वहात नसेल ते रिक्त अंग असते. प्रत्येक नाकपुडीतून साद्यारण १ तास श्वासोच्छवास चालू असतो व त्या वेळेस पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची तत्वे निसर्गातून ओढून घेऊन ती शरीराला पुरविली जातात.
जास्तीत जास्त २ तास एका नाकपुडीत स्वर चालू असेल तरी धीक, परंतु त्यापेक्षा जर जास्त काळ एकच स्वर चालू राहिला तर अशुभ सूचक किंवा संकट सूचक समजावे.प्रापंचिक कामासाधी उजवी किंवा डावी नाकपुडी किंवा नाडी उपयोगात आणावी. सुषुम्ना कार्यनाश करते.पारमार्थिक कामासाधी उजवी किंवा डावी नाकपुडी कुचकामी असते तर सुषुम्ना अती मौल्यवान म्हणूनच जप तप ध्यान द्यारणेसाधी सुषुम्नाच हवी असते. तशीनसल्यास प्रयत्न पूर्वक साद्यावी लागते नाही तर काळाचा बराच अपव्यय करावा लागतो.साद्यू संन्याशी योगी किंवा स्वर ज्ञानी यांना स्वर बदलण्याची क्रिया साध्य झालेली असते.साद्यू संन्याशी योगी कुबड्या का वापरतात, तर त्या कुबडीचा उपयोग स्वर बदलण्यासाधी केला जातो. ज्या बगलेत कुबडी बसवितात तिकडील स्वर त्वरित बंद होतो व द्वसरा वाहै लागतो मग तोही कुबडी बंद करतात.
मग दोन्ही नाकपुडीतून स्वर वाहै लागतो तीच सुषुम्ना व तिच त्यांना हवी असते. तेव्हा कुबडी ही स्वर बदलण्यासाधी बाळगावी लागते. हाताला कळ लागते तेव्हा टेवूत् देण्यासाधी नाही.आत्मा ज्या नाडीत प्रवेश करतो त्याच नाडीचा स्वर चालू राहातो. ज्या बाजूचा स्वर चालू असेल त्या बाजूचा तळहात झोपेतून उधताच आपल्या तोंडावरून उतरता फिरवावा म्हणजे दिवसभर इाूच्छत फल प्रा-ती होते.गुरू, बंद्यू, अमात्य यांचे कडून काही काम करून घ्यायचे असेल तर त्यांचेकडे आपले पूर्ण अंग करावे म्हणजे काम होते.शुभ कामासाधी डावी नाडी श्रेष्।ठ असते. क्काुत्र, तामसी कामासाधी उजवी नाडी श्रेष्।ठ असते.डावा स्वर वहात असेल व डावीकडून किंवा समोरून दूत आल्यास शुभकारक समजावा. उजवा स्वर वहात असेल व उजव्या बाजूने, मागून किंवा खालून दूत आल्यास शुभ सूचक होय.
जिकडची नाडी वहात असेल तिकडून कोणी प्रश्न विचारला तर त्याचे प्रश्नासंबंद्यी कार्य सिध्दीला जाते म्हणून होकार देण्यास हरकत नाही.जी नाडी वहात नसेल, म्हणजे रिक्त अंगाकडून कोणी प्रश्न केल्यास त्याचे कामात यश येत नाही म्हणून नकार धावा. दोन्ही नाकपुडीतून स्वर चालू असेल आणि कोणी प्रश्न विचारल्यास कार्य नाश होतो म्हणून तूर्त काम स्थगित धेवा असे सांगावे.काळ, नाना प्रकारची घोर अस्त्रे, सर्प, शत्रू, व्याद्यी आणि चोर शून्य स्थानी असतील म्हणजे जिकडून स्वर वहात नसेल, त्या बाजूला असतील तर ते त्या माणसाचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. कारण –
न कालो विविद्यं घोरं न शस्त्रं न च पन्नगाः । न शत्रु व्याद्यि चोराधा : शुन्य स्थानाशितुं क्षमा ॥
गरोदर स्त्रीला पुत्र होईल की कन्या, असा प्रश्न असेल व त्यावेळी डावा स्वर वहात असेल तर कन्या, उजवा स्वर वहात असता पुत्र व दोन्ही स्वर वहात असल्यास निर्णय देवू नये. आजारी माणसांबद्दल प्रश्न विचारणारा प्रथम शुन्य अंगाला असला आणि मग पूर्ण अंगाकडे जाऊन रोग्याविषयी प्रश्न विचारला तर रोगी निश्चित जाणार म्हणून समजावे. जिकडून स्वर वहात असेल तिकडूनच प्रश्न असल्यास होकारार्थी उत्तर धावे. जिकडून स्वर वहात नसेल तिकडूनच प्रश्न असल्यास नकारार्थी उत्तर धावे. दोन्ही स्वर वहात असता प्रश्न विचारल्यास तूर्त स्थगित म्हणून सांगावे.
अशा प्रकारे स्वर ज्ञानाचा उपयोग आपणास करून घेता येतो. यात स्वरातील तत्वज्ञान साध्य झाल्यास फारच चांगले, परंतु तत्वज्ञान अएयासाशिवाय साध्य होणे कधीण असल्याने त्याचे विवेचन केलेले नाही.

संपर्क: ०२५५७-२२१७१०

थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा.

१) हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा. 

२) वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तींला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र शक्यतो आपल्या पैशाने घ्यावे). नंतर व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.

  • अभ्यंग: सुवासिक तेल लावून.
  • सचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान द्यावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळावे,

३) नंतर दोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर. उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

टीप:

१) आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे.

२) केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पद्धतीने वाढदिवस साजरा करावा.

अधिक माहितीसाठी नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) केंद्रातील सेवेकरी प्रतिनिधींशी संपर्क करावा. श्री रामरक्षा व विविध स्तोत्र मंत्राने युक्त असा दैनंदिन नित्यसेवाग्रंथ नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध. तसेच अॅप्समध्ये हि उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा डाऊनलोड: आपल्या नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जाणून घेण्यासाठी संपर्क करा. 02557-221710