Donation

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,त्र्यंबकेश्वर ट्रस्टला त्यांच्या विविध उपक्रमांसाठी ऑनलाईन दान करू शकता खालीलप्रमाणे विविध देणगी निधी आहेत:

For Annachatra (अन्नछत्रसाठी)

For Annachatra (अन्नछत्रसाठी)

प्रसादालय:- श्री गुरुपिठाच्या अन्नछत्र या महत्वपूर्ण या विभागाचे व्याप्त व सुसज्ज स्वरूप तयार झाले आहे. प्रसादालयात येणाऱ्या भाविकांना प्रथम अन्नपूर्णा मातेच्या दाक्षिणात्य पद्धतीची, मनमोहक मूर्तीचे दर्शन लाभते. अन्नछत्र या विभागाची सुसज्ज, आधुनिकतेचे परिपूर्ण अशी इमारत असून त्याचे इमारत असून त्याचे क्षेत्रफळ ६५००० चौरस मीटर बिल्ट अप् एरिया ग्राउंडसह दोन मजले बांधकाम असलेली इमारत आहे. अद्ययावत, सुसज्ज किचन, तसेच कोल्ड स्टोरेज व सौरउर्जेवर अन्नाची निर्मिती करण्यात येते. जेणे करून त्यामुळे इंधनाची बचत होईल. अन्नधान्याची साठविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने निर्जंतुकीकरण असलेले साठवण केंद्र (गोडावून) व तयार झालेले अन्न दुसऱ्या मजल्यावर नेण्यासाठी विद्युत पाळणा (लिफ्ट) आहे. पहिल्या मजल्यावर एक भव्य हॉल असून त्या हॉलमध्ये एकाचवेळी १ हजार लोक बसून भोजनाचा आनंद घेऊ शकतील. आणि या सर्वांची आसन व्यवस्था स्वतंत्र असेल. स्त्री आणि पुरुष असे दोन स्वतंत्र भाग असून स्वतंत्रतेने महाप्रसादाचा आस्वाद घेता येतो. भव्य अन्न छत्रामध्ये भरपूर हवा आणि प्रकाश असून अत्याधुनिक तंत्राने युक्त अशी अन्नछत्र इमारत आहे. आपणही या अन्नदानामध्ये सहभागी होऊ शकता ….!

For Development (बांधकामनिधी)

For Development (बांधकामनिधी)

मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय :- देशभरातील सर्व श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र, जिल्हा व तालुका विभाग प्रतिनिधी सेवेकरी प्रशासकीय कामाचे नियोजन, स्वरूप व आढावा जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ गुरुपिठावर एकत्र येतात. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या प्रशासकीय सुविधा पुरविण्यासाठी भव्य असे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय श्री गुरुपीठ येथे आहे.

For Hospital (हॉस्पिटल)

For Hospital (हॉस्पिटल)

सदगुरु प.पू.मोरेदादा चॅरीटेबल:- सुमारे २१ एकरच्या विस्तीर्ण परिसरात अद्ययावत सुविधा असलेले अध्यात्मिक स्वरूपाचे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल निर्माणाधीन असून, या हॉस्पिटलमध्ये निसर्गोपचार पद्धतीने आरोग्यदायी अत्याधुनिक शल्यचिकित्सा व पारंपारिक चिकित्सेचा अभूतपूर्व संगम दिसून येईल. तसेच हृदयरोग, नेत्ररोग, किडनी, कर्करोग, बालरोग चिकित्सा, स्त्रीरोग, मधुमेह रक्तदाब इ. अनेक आजारांवर नर्सिंग कॉलेज तसेच डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता निवास व भोजनाची व्यवस्थाही असेल. सद्यस्थितीत हॉस्पिटलची वास्तू निर्माणाधीन अवस्थेत असल्याने हॉस्पिटलचे बाह्य रुग्ण तपासणी विभाग श्री गुरुपिठात श्री प्रसादालयात पहिल्या मजल्यावर कार्यरत असून अनेक रुग्ण त्या सेवेचा लाभ घेत आहे.

For Goshala (गोशाला

For Goshala (गोशाला

गोशाळा:- हिंदू धर्मात गो-मातेचे अनन्यसाधारण महत्व असून, श्री गुरुपिठातील गो-शाळा हा विभाग गायींचे पालन-पोषण करून आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी गोमुत्रांचा उपयोग करतो.

आपणही सर्व देणगी निधीत सहभागी होऊ शकता. तसेच देणगी निधी कलम 80G नुसार पूर्णपणे आयकर कपातीसाठी पात्र आहेत ( सरकार . भारत ) या साइटवर ई- देणगी प्रक्रिया माध्यमातून आपली देणगी सुरक्षित आहे. जर आपल्याला अन्नछत्रा साठी ,सदगुरू प.पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटलसाठी , गोशाळेसाठी किंवा इतर देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुपीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात, तसेच खालील A/C मध्ये आपली देणगी स्वेच्छेने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ,त्र्यंबकेश्वर ट्रस्टला ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने दान करू शकता. सदर देणगीवर आयकर माफ असेल. बँक A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.
Read and agree to our Privacy Policy and Terms and Conditions before entering to e-Donation

देणगी साठी नियम व अटी(रद्द/परतावा)
1) अयशस्वी व्यवहार 100% परतावा.
2) बँकेचे शुल्क देणगीदारास देय असेल .
3) एकदा दिलेली देणगी रद्द करता येणार नाही.
4) सेवा अधिष्टीत उत्पादनांच्या देणगी मूल्याचा परतावा न देना सेवेचा      कालावधी वाढवून देण्यात येईल.
उदा. SMS आणि व्हॉइस कॉल सेवा, स्वामी सेवा मासिक/त्रैमासिक,विवाह- SMS किंवा ईमेल सेवा इत्यादी.

Donation Project
Donation Amount ₹