बालसंस्कार व युवा प्रबोधन या विभागाच्या माध्यमातून सृजन व सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य होत असून मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी केंद्र, गाव शाळा व वाडे, वार्ड, कॉलनी, अनाथलय, आश्रमशाळा, इत्यादी ठिकाणी बालसंस्कार वर्ग सुरु करून विद्याथ्यांना सर्वगुणसंपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश इ. विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य या विभागातून केले जाते. याच बरोबर विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व समाजशील घडावेत म्हणून पर्यावरण शिक्षण, परसबाग (सेंद्रिय व नैसर्गिक शेती), कायदा जागृती, विविध कला, क्रीडा, कौशल्य विकास, स्तोत्र मंत्रांचे पठाण व त्यातील विज्ञान ऋषीमुनींनी केलेल्या संशोधनाविषयी जागृती, सुसंकल्प करणे असे विविध उपक्रम राबविले जातात, याच बरोबर पालकसभांचे आयोजन, हिवाळी व उन्हाळी शिबिरे तसेच युवा वर्गासाठी स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा, मुलाखतीबद्दल मार्गदर्शन व प्रशिक्षणे या विभागाद्वारे दिली जातात. प्रतिमाह चौथ्या शनिवारी मासिक सत्संगाच्या निमित्ताने सर्व बालसंस्कार प्रतिनिधींना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सर्व प्रतिनिधी आपापल्या विभागात विनामुल्य सेवा करतात.
संपर्क : ०२५५७-२२१७१०, ०२५९४-२३३७०७
अधिक माहितीसाठी : http://balsanskar.dindoripranit.org/
बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग वृत्तांत :
* विद्यार्थ्यांना लहान वयात चांगले संस्कार झाले तरच भावी पिढी चांगली घडेल.
* बालसंस्कार संकल्पना सद्गुरु परमपूज्य पिठले महाराजांनी प्रथम सद्गुरु परमपूज्य मोरेदादांजवळ मांडली, आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात ‘केंद्र तेथे बालसंस्कार वर्ग’ सुरू झाले.
* बालसंस्कार वर्ग केवळ एक वर्षासाठी नसून परमपूज्य गुरुमाऊलींनी सातत्याने बालसंस्कार अभियान राबवण्यावर विशेष लक्ष दिले आहे.
* बालसंस्कार वर्गातून बाहेर पडणारे विद्यार्थी आता विविध क्षेत्रात चमकू लागले आहेत. त्यांचा गौरव होताना दिसतो आहे. ज्या गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना शाळेत मिळत नाही ते ज्ञान बालसंस्कार वर्ग उपक्रमातून मिळत आहे.
* विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून भारतीय संस्कृतीचे महत्व या विभागातून सांगितले जाते.
* शिक्षक, गुरूजनांना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात बालसंस्कार व युवा प्रबोधन तसेच शिक्षक मांदियाळी कार्यक्रम सांगली, अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड या जिल्ह्यांमधे यशस्वीपणे संपन्न झाले आहेत.
* बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागांतर्गत मिड ब्रेन तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यात आले. योग आणि विज्ञानाच्या माध्यमातून आपण मुलांना हे तंत्रज्ञान शिकवू शकतो.