प्रापंचिक, पारमार्थिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या दु:खी, आर्त, पीडितांना त्यांच्या समस्यांनुसार आध्यात्मिक सेवा व मार्गदर्शन करून समस्या सोडविण्याचे महत्तम कार्य प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प.पू.गुरुमाऊली अखंडितपणे दर गुरुवार व रविवार श्री क्षेत्र दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात करतात. प.पू.गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण विभागांतर्गत प्रशिक्षित सेवेकरी, सेवामार्गाच्या प्रत्येक सेवाकेंद्रात प्रश्नोत्तराची सेवा करतात. समस्याग्रस्त, आर्त पिढीत व्यक्तीच्या जिवात जीव घालुन आध्यात्मिक मार्गदर्शनाने संबंधित व्यक्तीची समस्या विनामुल्य सोडविण्याचे सेवाभावी कार्य हा विभाग करीत आहे.