३.विवाह संस्कार विभाग

सुयोग वैवाहिक जोडीदार मिळून , सुखी व समाधानी जीवनासाठी विवाह संस्कार विभागाद्वारे विवाह इच्छुकांना आध्यात्मिक सेवा व मार्गदर्शन केले जाते. सर्व जाती- धर्मीयांसाठी मोफत नाव- नोदणी करून विवाहनुरूप अपेक्षित स्थळांची माहिती देण्यात येते. विवाहपूर्व क विवाहोत्तर मार्गदर्शन करून ,कुलधर्म व कुलाचार विषयक मार्गदर्शन केले जाते. गर्भवती माता भगिनींना प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात उपयुक्त संस्कारांचे मार्गदर्शन करण्यात येते. तसेच विविध सामाजिक उपक्रम, सर्व जातीय -धर्मीय वधु -वर परिचय मेळावे, अल्प खर्चातील सामुदायिक विवाह सोहळे, स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी जनजागरण दिवासीसमाजासाठी विशिष्ट विवाह मंडळ, हुंडा मानपान अनिष्ट रुढींचे निर्मुलन इत्यादीद्वारे जनजागृती करण्यात येते वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी हा विभाग कार्यशील आहे.

संपर्क :7755941710  /  02557-221710

अधिक माहितीसाठी :vivah.dindoripranit.org      E-mail:vivahenond@gmail.com