७.कायदेशीर सल्लागार विभाग

कायदा, सुव्यवस्था व कौटुंबिक जीवन यांचा मेळ घालून भगवदगीतेचा अभ्यास करून भारतीय घटना सोप्या पद्धतीने सामजून सांगण्याचे कार्य या विभागात केले जाते. आजच्या युगात विविध समस्यांनी ग्रस्त झलेल्या जन-सामान्यांना कायद्याचे योग्य ज्ञान, कायद्यात सांगितलेली विवध कलमे, सायबर क्राइम, गुन्हेगारी, कायद्याचे आदर युक्त भीती व जनजागृती, गुन्हेगारी वृतीपासून परावृत्त करणे, महिलांना त्यांच्या मुलभूत हक्कंची जाणीव, वैवाहिक जीवनातील विविध समस्यांवर समुपदेशन, कोर्ट- कचेरीची माहिती सेवामार्गातील सेवानिवृत्त व कार्यरत वकील, न्यायमूर्ती सेवेकरी या विभागाच्या माध्यमातून जनप्रभोधनाचे कार्य करीत आहेत.

संपर्क;(02557)221710,7757008652