श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील कृषीशास्त्र विभाग असून कृषक बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना सुखी, समृद्ध व स्वावलंबी करण्यासाठी पारंपारिक शेतीला अध्यात्म व विज्ञान यांची योग्य सांगड घालून सहज सोप्या पद्धतीत प्रशिक्षणातुन प्रशिक्षित केले जाते. शेतेतील विविध समस्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच मनोबल वाढीसाठी राष्ट्रीय कृषी सत्संग मेळाव्याद्वारे प्रभोधन केले जाते. जागतिक तापमान वाढ व हवामान बदलातील दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय/नैसर्गिक शेतीद्वारे जैव विविधतेची जोपासना करणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देशी गावरान बियाणे संवर्धन व प्रचार – प्रसार , देशी गौवंश संगोपन, घरगुती खते औषधे निर्मिती, खेडयांकाडून शहराकडे होणारे स्थानांतर टाळण्यासाठी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण व गटशेतीद्वारे कृषिपूरक जोडव्यवसाय व प्रक्रिया निर्मिती, करून बाजारपेठ उपलब्ध करणे, भौगालिक स्थितीला अनुकूल स्थानिक पीक पद्धतीनुसार जिल्हानिहाय दिंडोरी प्रणीत आदर्श शेती मॉडेल तयारकरण्याचे महत्वपूर्ण कार्य या विभागातून केले जाते. संपर्क: (०२५५७) २२१७१०, ७७५७००८६५२ अधिक माहितीसाठी :krushi.dindoripranit.org
कृषीशास्त्र व पशुगौवंश विभाग मार्गदर्शन चर्चासत्र व प्रशिक्षण शिबीर, मासिक सत्संग, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर(नाशिक) (प्रमुख मार्गदर्शक: आदरणीय श्री. आबासाहेब मोरे) मार्च २०१९ * जागतिक कृषी महोत्सव २०१९ हा आपल्या प्रतिनिधींमुळे अतिशय भव्यदिव्य असा संपन्न झाला त्या बद्दल सर्व प्रतिनिधींचे हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पुढील कार्यक्रमासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवे. शेतीचे उत्पन्न म्हणजेच त्या राष्ट्राचे राष्ट्रीय उत्पन्न असते, त्या करिता शेतकरी वर्गानेच पुढे यायला हवे. * गहू काढणीनंतर उरलेला भूसा न पेटविता अमृत जलात भिजवून त्याचे आच्छादन करावे, परिणामी वातावरणात प्रदूषण तयार न होता, त्यातून जमिनीला चांगल्या प्रकारचे अन्नद्रव्ये मिळतात. उन्हाळ्याच्या काळात फळबाग करणार्या शेतकर्यांनी सक्तीने शेतात अशा प्रकारचा बायोमास वापरायला हवा. * कृषीशास्त्र विभागाद्वारे विषमुक्त शेती करावी, जोडव्यवसायासाठी स्वयंरोजगार विभागाची मदत घ्यावी आणि विपणन व्यवस्थेसाठी सात्विक कृषिधन मदत करेल. परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात, ‘अन्नाचा परिणाम शरीराबरोबरच मनावरही होतो.’ त्या हेतूने देशाचे रक्षण करणार्या सैनिकांपर्यंत सात्विक भावनेने तयार केलेले अन्न पुरविण्याचे कार्य आपणास करायचे आहे. * शेतकर्यांनी श्री जनकल्याण योजनेत सहभाग घेऊन आपला खारीचा वाटा उचलावा. शेतमालास जेव्हा भाव मिळत नाही तेव्हा वाळवून (ऊशहळवीरींळेप) तो विकावा. बांधावर झाडे लावल्याशिवाय शेती शक्य नाही. * बी-बियाण्यांपासून ते लागवडीपर्यंत तसेच काढणी पश्चात विपणन तंत्र अशा सुविधा आपण शेतकर्यांपर्यंत देऊ केल्या आहे याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा. * शेतमाल कंपनी अंतर्गत विकण्यासाठी प्रमाणीकरण करणे गरजेचे असते, वैयक्तिक प्रमाणिकरण केल्यास जास्त खर्च येतो. तेच सामुहिक केले असता कमी खर्च येतो, म्हणून शेतकरी गटांचे प्रमाणिकरण करावे. अधिक माहितीसाठी संपर्क : ७७५७००८६५२ * शेतकर्यांनी किमान १० गुंठ्यात विषमुक्त शेती करावी. बांबू पीक विषयक विशेष माहिती कार्यशाळा : परमपूज्य गुरुमाऊली यांचा हा आवडीचा विषय असून त्यासाठी कृषीशास्त्र विभाग अथक परिश्रम घेत आहे. उपस्थित शेतकर्यांना मा.श्री.आबासाहेबांनी तसेच श्री.चिंचोलकर सर यांनी बांबू विषयाचे महत्व विशद केले. बांबू लागवड केले असता त्यास कुठलाही रोग होत नाही, स्प्रे देण्याची गरज नाही, सर्रास बांधावर याची लागवड करावी. कृषीशास्त्र विभागामार्फत आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बांबू हे सर्वात जलद गतीने वाढते, त्यास विशेष असा गवताचा दर्जा मिळालेला आहे. बांबू लागवडीसह संपूर्ण माहिती त्यातील योजना आणि त्यानंतर बाजारपेठ अशी सुविधा असल्यामुळे शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा. फेब्रुवारी २०१९ * प.पू.गुरूमाऊलींच्या आशीर्वादाने कृषीशास्त्र विभाग आज प्रगतीपथावर जात असून या विभागाच्या माध्यमातून असंख्य शेतकरी जोडले जात आहे. * आज आपण तणनाशकाचा वापर करतो तो एक अविभाज्य भाग बनला असून, या तणनाशकामुळे जमिनीची उत्पादकता कमी तर होणार नाही ना? याचे भान शेतकर्याने ठेवायला हवे. * रानभाज्या व तनभाज्यांची माहिती ग्रामीण भागात, वनात राहणार्या महीलांना असते त्यामुळे त्या महिला पारंपरीक आणि औषधी वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणुन सर्रास वापर करतात. * बोंडअळी नियंत्रीत करण्यासाठी ट्रॅपचा वापर करावा. * कृषीशास्त्र विभाग म्हणजेच शेतीचेशास्त्र, यामध्ये विविध कामे करता येतात, यात श्रमसाफल्य, आपल्यातील कौशल्य यांची जडण-घडण होते. * सूर्य अग्नीतत्वाचे प्रतिक असल्यामुळे वनस्पती फांद्या व पानांतून, तर चंद्र जलतत्वाचा प्रतिक असल्याने झाडांच्या मुळांमधून अन्न तयार करतात. * सर्व शेतकरी बांधवांनी पंचांग अभ्यासले पाहीजे; त्यातील संवत्सर फलामध्ये संपुर्णपणे शेतीचा वार्षिक अहवाल असतो. पावसासंबंधीच्या अनुमानात हवामान खात्यापेक्षा ज्योतीषशास्त्राचा प्रभाव अधिक दिसून येतो. * खतांऐवजी निसर्गातील विविध घटकांचा योग्य वापर करून देखील शेती करता येते. * शेती व शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी शाकंभरी सिड बँक महत्वाची ठरेल.