१२.पर्यावरण प्रकृती विभाग

या विभागात महाराष्ट्रात, परराज्यात व परदेशात लाखो प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, दुर्ग संवर्धन, जल संवर्धन, दुर्मिळ वनौषधी संशोधन इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनातून नदी स्वच्छता, पाण्याची काटकसर, पुनर्भरण व पुनर्वापर उपक्रम, कचरा विनयोग व्यवस्थापन (टाकाऊ पासून टिकाऊ), ध्वनी प्रदूषणावर नियंत्रणासाठी (फटाके व डी.जे बंदी) फटाक्यांचा वापर न करता ई-दिवाळी (Computer Mobile Application)द्वारे साजरी केली जाते. पर्यावरणातील विविध माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारातून बेरोजगारांना स्वयंरोजगार दिला जातो (उदा.मातीचे गणपती, आकाशकंदील. रक्षाबंधनासाठी राखी बनविणे इ). पशु, पक्षी व प्राणी यांची माहिती व संवर्धन, अन्न नासाडी टाळून अन्नदान मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावरण जनजागृती, गड-किल्ल्यांचे स्वच्छता-संवर्धन, पर्यावरण पूरक सेवा केंद्र कसे असावे यासारख्या विविध उपक्रमातून जनजागृती व संदेश सर्वत्र पोहचविण्याचे कार्य या विभागातून होत आहे.

संपर्क:(०२५५७) २२१७१०, ७७५५९४१७२१

E-Mail: ppvdindori@gmail.com